मिटक्या मारत त्यांनी जेवणावर ताव मारला! हनुमान जयंती निमित्तानं खास बसली वानरांची पंगत, VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रामदास महाराज यांनी ताटं वाढली तसं वानर सेना हळूहळू जमायला लागली. जेवण वाढल्यावर वानरांनी बसून छान पोट भरेपर्यंत खाल्लं. या भागात मोठ्या प्रमाणात वानर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खास पंगत मांडली होती.
देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्सव सुरू आहे. याच निमित्ताने वानरांना खास नैवेद्य दाखवला जात आहे. हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील कोथळी बुद्रुक येथील मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात एक विलोभनीय आणि अनोखी परंपरा पाहायला मिळाली. पुजारी रामदास महाराज यांनी चक्क परिसरात वास्तव्यास असलेल्या वानर सेनेलाच महाप्रसादाचे आमंत्रण दिलं
रामदास महाराज यांनी ताटं वाढली तसं वानर सेना हळूहळू जमायला लागली. जेवण वाढल्यावर वानरांनी बसून छान पोट भरेपर्यंत खाल्लं. या भागात मोठ्या प्रमाणात वानर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खास पंगत मांडली होती. वानरांनी देखील कोणतीही भांडणं न करता छान पंगतीला बसून खाल्लं. याचा व्हिडीओ समोर आला आहे. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून रामदास महाराजांनी या वानरांसाठी विशेष मेजवानी तयार केली होती. तब्बल १०० हून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थ वानरांना पंगतीला दिले.
advertisement
या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माकडांनी दाखवलेली शिस्त. साधारणपणे अन्नासाठी झटापट करणारी माकडे येथे मात्र चक्क एका रांगेत शांतपणे बसली होती. पुजारी महाराजांनी नैवेद्य दाखवल्यानंतर या वानर सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. प्राण्यांमधील ही समज आणि शिस्त पाहून उपस्थित भाविकही थक्क झाले.
advertisement
पुजारी रामदास महाराज गेल्या अनेक वर्षांपासून ही अनोखी परंपरा न चुकता जपताना दिसत आहेत. "हनुमानजींचे रूप मानल्या जाणाऱ्या या वानर सेनेची सेवा करणे, हाच खरा जन्मोत्सव आहे," अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अनोख्या पंगतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी या परंपरेचं कौतुक करत आहेत.
advertisement
नागपूरमध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक माकड दररोज हॉटेलमध्ये येऊन शांतपणे जेवण करत असल्याची अनोखी घटना समोर आली आहे. नागरिक याकडे श्रद्धा आणि जिव्हाळ्याच्या नजरेतून पाहत आहेत.
Location :
Akola,Akola,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मिटक्या मारत त्यांनी जेवणावर ताव मारला! हनुमान जयंती निमित्तानं खास बसली वानरांची पंगत, VIDEO










