advertisement

Panchak 2026: दर्श अमावस्या-सूर्यग्रहण असतानाच पंचक लागणार; सलग 5 दिवस घातक परिणाम, अलर्ट

Last Updated:

Panchak 2026: मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात आणि यामध्ये आगीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगावी लागते. तसेच शनिवारी सुरू होणारं पंचक हे मृत्यू पंचक असतं, त्याला सर्वात जास्त अशुभ मानलं जातं.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात अनेक शुभ-अशुभ गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे. दर महिन्याला असे काही दिवस येतात ज्यांना पंचक म्हटलं जातं. या दिवसात कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं, कारण हा काळ अशुभ मानला जातो. पंचकाचं महत्त्व हे नक्षत्रांवर आणि ते कोणत्या वारी सुरू होत यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात आणि यामध्ये आगीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगावी लागते. तसेच शनिवारी सुरू होणारं पंचक हे मृत्यू पंचक असतं, त्याला सर्वात जास्त अशुभ मानलं जातं. यावेळचं पंचक 17 फेब्रुवारी 2026, मंगळवारी सकाळी 09:05 वाजता सुरू होऊन 21 फेब्रुवारी 2026, शनिवारी संध्याकाळी 07:07 वाजता संपेल. फेब्रुवारी महिन्याचं हे पंचक मंगळवारी सुरू होत असल्यामुळे याला अग्नी पंचक म्हटलं जाईल.
पंचकात कोणत्या गोष्टी टाळाव्या - पंचकाच्या काळात लाकडाशी संबंधित कामं करणं अशुभ मानलं जातं. कोणत्याही प्रकारचं लाकडी फर्निचर, जसं की पलंग किंवा खाट बनवणं टाळायला हवं. घराचं छत टाकणं किंवा बांधकामाला सुरुवात करणंही अशुभ असतं. या काळात विवाह, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही मंगल कार्य करणं वर्जित आहे. याशिवाय, पंचकात दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळावं, कारण ही यमाची दिशा मानली जाते. विशेषतः अग्नी पंचकात अवजारं, यंत्रसामग्री किंवा नवीन बांधकामाची सुरुवात करणं नुकसानदायक ठरू शकतं.
advertisement
पंचकात करता येण्यासारखे उपाय - पंचकात अनेक कामं निषिद्ध असली, तरी काही उपाय करून त्यातील नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. जर काही कारणास्तव दक्षिण दिशेला प्रवास करणं गरजेचं असेल, तर निघण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचा आणि प्रवासाची सुरुवात उत्तर दिशेला काही पावलं चालून करा. पंचकाच्या पाचही दिवसात भगवान शिव आणि विष्णूची नियमित पूजा करणं शुभ मानलं जातं. याशिवाय तुळशीचं पूजन करणंही सकारात्मक असतं. या काळात दानधर्म आणि पुण्यकर्म करणं खूप फायदेशीर ठरतं.
advertisement
पंचक कसं ठरतं - पंचक हे फक्त पाच विशेष नक्षत्रांमध्येच येतं: धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं. या श्रेणीत धनिष्ठा हे पहिलं नक्षत्र आहे आणि रेवती हे शेवटचं. या नक्षत्रांच्या काळात ध्यान आणि पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याचा आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Panchak 2026: दर्श अमावस्या-सूर्यग्रहण असतानाच पंचक लागणार; सलग 5 दिवस घातक परिणाम, अलर्ट
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement