Mumbai Local Train : गुड न्यूज! शिवजयंतीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी आणि 3 साध्या लोकलची भर; वाचा वेळापत्रक
Last Updated:
Local Train Schedule : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून रेल्वेतील एका मार्गावर नवीन लोकलची भर पडणार आहे. जाणून घ्या या गाड्यांचे वेळापत्रक.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल आणि 3 नवीन नॉन-एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या एसी प्रवासाच्या मागणीमुळे आणि सामान्य प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्यापासून लोकलचा प्रवास होणार 'कूल'
या 12 एसी लोकलपैकी 11 गाड्या सध्या चालणाऱ्या नॉन-एसी लोकलच्या ऐवजी सुरू केल्या जाणार आहे तर एक पूर्णपणे नवीन एसी लोकल असेल. या वाढीमुळे एकूण एसी लोकलची संख्या 121 वरून 133 इतकी होणार आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या एसी सेवांची संख्या 77 वरून 106 पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे वीकेंडला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि गारवा देणारा प्रवास अनुभवता येईल.
advertisement
1)अप मार्गावर लोकलचे वेळापत्रक असे असेल?
बोरिवली-चर्चगेट : सकाळी 05:45 ला सुटणार, 06:51 ला पोहोचणार स्लो एसी लोकल
बोरिवली- चर्चगेट : सकाळी 08:06 ला सुटणार, 09:11 पोहोचणार स्लो एसी लोकल
गोरेगाव -चर्चगेट : सकाळी 10:11ला सुटणार , 11:09 पोहोचणार स्लो – एसी
बोरिवली - चर्चगेट : सायंकाळी 17:27 सुटणार, 18:35 पोहोचेल स्लो – एसी
advertisement
भाईंदर – अंधेरी : सायंकाळी 20:20 सुटणार, 20:59 पोहोचेल स्लो -एसी
वसई रोड – बोरिवली : सायंकाळी 22:20सुटणार, 22:46 पोहोचेल स्लो - एसी
वांद्रे – चर्चगेट : सायंकाळी 14:57 सुटणार ,15:29 पोहोचेल स्लो-नॉन-एसी
2)डाऊन मार्गावर असं असेल लोकलचे वेळापत्रक?
चर्चगेट – बोरिवली : सकाळी 06:55, 08:00 ला पोहोचणार स्लो-एसी
चर्चगेट – गोरेगाव : सकाळी 09:14, 10:07 ला पोहोचणार स्लो-एसी
advertisement
चर्चगेट – मुंबई सेंट्रल : सकाळी 11:12, 11:22 ला पोहोचणार स्लो-एसी
महालक्ष्मी – बोरिवली : सायंकाळी १६:३० सुटणार, 17:23 ला पोहोचणार स्लो-एसी
चर्चगेट – भाईंदर : सायंकाळी 18:38 सुटणार, 20:03 ला पोहोचणार स्लो-एसी
अंधेरी – वसई रोड : सायंकाळी 21:08 सुटणार, 21:58 ला पोहोचणार स्लो-एसी
भाईंदर – विरार : सायंकाळी 10:41 सुटणार, 11:10 ला पोहोचणार स्लो-एसी
advertisement
चर्चगेट – वांद्रे : सायंकाळी 13:41 सुटणार, 14:12 ला पोहोचणार स्लो-नॉन-एसी
वरील वेळापत्रकानुसार नव्याने सुरू होणाऱ्या एसी आणि नॉन-एसी लोकल सेवांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 9:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Train : गुड न्यूज! शिवजयंतीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी आणि 3 साध्या लोकलची भर; वाचा वेळापत्रक








