advertisement

मुलाला भूक लागली असेल म्हणून वडील धावले; पण रस्त्यातच भयानक घडलं, बापाच्या हातातला डबा रक्तानं माखला

Last Updated:

कामावर असलेल्या आपल्या मुलाचा जेवणाचा डब्बा घेऊन जातानात वडिलांवर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाला.

अपघातात वडिलांचा मृत्यू (AI Image)
अपघातात वडिलांचा मृत्यू (AI Image)
पुणे : एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कामावर असलेल्या आपल्या मुलाचा जेवणाचा डब्बा घेऊन जातानात वडिलांवर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाला. पुंजाराम सुंदरराव मरकड (वय ६५, रा. मांडवी बुद्रुक ता. हवेली) असं या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
आपल्या मुलासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन जात असतानाच पुंजाराम मारकड यांच्या दुचाकीला अचानक भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने धडक दिली. मांडवी बुद्रुक येथील अरुंद पुलाजवळ ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले आणि दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. यासोबतच चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअपही उलटून पडली. यात मारकड यांचा जागीच मृत्यू झाला. नितेश गणेश पवार (रा. भिमनगर, कोंढवे धावडे, उत्तम नगर, ता. हवेली) असं पिकअप चालकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर आणि हवेली पोलीस ठाणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मुलाचा डबा पोहोच करण्यासाठी निघालेल्या वडिलांवरच काळाने अशा प्रकारे घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
या अपघातानंतर पुंजाराम मारकड यांच्या मुलाने पोलीस पिकअप चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच अपघातावेळी पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही मुलाने केला आहे. त्यामुळे चालकाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून हवेली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिकअप चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र, असं न करता पोलीसच चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला आहे
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुलाला भूक लागली असेल म्हणून वडील धावले; पण रस्त्यातच भयानक घडलं, बापाच्या हातातला डबा रक्तानं माखला
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement