advertisement

लहान मुलांना आवर्जून दाखवा, शिवकालीन लढाऊ जहाजांची माहिती देणारं अनोखं प्रदर्शन; कधी अन् कुठे?

Last Updated:

दोन दिवस हे प्रदर्शन शहरामध्ये असणार आहे. सातारा येथील कलाकार कुमार गुरव यांनी ह्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत.

+
शहरात‎  title=शहरात भरविण्यात आले आहे शिवकालीन नवकाचे प्रदर्शन 
‎  />

शहरात भरविण्यात आले आहे शिवकालीन नवकाचे प्रदर्शन 
‎ 

छत्रपती संभाजीनगर : 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. दोन दिवस हे प्रदर्शन शहरामध्ये असणार आहे. सातारा येथील कलाकार कुमार गुरव यांनी ह्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत.
संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी दर्यापती शिवराय ह्या संकल्पनेतून शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. सातारा येथील कुमार गुरव यांनी या सर्व प्रतिकृती तयार केल्या आहेत. ते पीएचडीचा अभ्यास करतात आणि या सर्व प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत.
advertisement
तेव्हा शिवाजी महाराज कशा पद्धतीने काम करायचे किंवा त्या काळात कशा पद्धतीने नौसेनेचे कामकाज चालायचे यावरती अभ्यास करून त्यांनी ह्या सर्व प्रतिकृती भरण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. एकदम बारीक आहे ना आणि खूप मेहनत घेऊन या प्रतिकृती त्यांनी तयार केलेल्या आहेत.
advertisement
या ठिकाणी आपण आपल्या लहान मुलांना आवर्जून या सर्व प्रतिकृती दाखवाव्यात. जेणेकरून आपल्या लहान मुलांना शिवाजी महाराज कशा पद्धतीने काम करायचे किंवा त्या काळात नौसेना कशा पद्धतीने काम करायची याची माहिती मिळेल. आयोजक कुमार गुरव यांनी म्हटले आहे. तर तुम्ही देखील शहरातील क्रांती चौक या ठिकाणी जाऊन हे प्रदर्शन बघू शकता दोन दिवस हे प्रदर्शन असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
लहान मुलांना आवर्जून दाखवा, शिवकालीन लढाऊ जहाजांची माहिती देणारं अनोखं प्रदर्शन; कधी अन् कुठे?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement