advertisement

Surya Grahan 2026: सूर्यग्रहण लागण्याआधी जेवणामध्ये तुळशीची पानं ठेवण्याचा नियम का आहे? कसा होतो परिणाम

Last Updated:

Surya Grahan 2026: हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला एक अशुभ खगोलीय घटना मानलं जातं. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्याचा परिणाम माणसाच्या घरावर, मनावर आणि पूजास्थळावर होतो, असे मानले जाते. त्यासाठी ग्रहणापूर्वी आणि ग्रहणानंतर काही विशेष नियम पाळले जातात.

News18
News18
मुंबई : बहुप्रतिक्षित वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज माघी अमावस्येदिवशी होत आहे. हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला एक अशुभ खगोलीय घटना मानलं जातं. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्याचा परिणाम माणसाच्या घरावर, मनावर आणि पूजास्थळावर होतो, असे मानले जाते. त्यासाठी ग्रहणापूर्वी आणि ग्रहणानंतर काही विशेष नियम पाळले जातात. ग्रहणापूर्वी म्हणजेच सुतक लागल्यावर अन्नात तुळशीचं पान टाकण्यापासून ते ग्रहण संपल्यानंतर घराचं शुद्धीकरण करण्यापर्यंत अनेक नियमांचं पालन केलं जातं.
आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं, तरी त्याचा प्रभाव जाणवू शकतो. अशा वेळी तुळशीशी संबंधित नियम आणि घर शुद्ध करण्याच्या पद्धतींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ग्रहणानंतर घराचं शुद्धीकरण का करतात?
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात पूजा करू नये, मंदिराचे दरवाजेही बंद ठेवले जातात, ज्यामुळे वातावरणात अशुद्धता येते. अशा वेळी ग्रहण संपल्यावर घराचं शुद्धीकरण करणं गरजेचं असतं, जेणेकरून घराचा आध्यात्मिक समतोल राखला जाईल आणि देवी-देवतांची कृपा कायम राहील. ग्रहणाचे वाईट परिणाम दूर करण्यासाठी हे शुद्धीकरण आवश्यक मानलं जातं.
advertisement
घराचं शुद्धीकरण कसं करावं?
सूर्यग्रहण संपताच संपूर्ण घराची साधी साफसफाई करून घ्या. खिडक्या उघडा जेणेकरून ताजी हवा घरात येईल. झाडू मारून घर स्वच्छ करा आणि पोछा लावा. पोछा लावण्याच्या पाण्यात थोडं सैंधव मीठ टाका, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.
ग्रहण संपताच स्नान करा - सफाई झाल्यानंतर लगेच स्नान करा. अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळल्यास सर्व विकार दूर होतात. स्नान करताना मंत्रजप केल्यास सकारात्मकता वाढते आणि तन-मन दोन्ही शुद्ध होतं.
advertisement
गंगाजल आणि कापूर वापरून शुद्धीकरण - स्नान केल्यानंतर घरात गंगाजल शिंपडा. एका वाटीत गंगाजल घेऊन त्यात थोडा कापूर मिसळा. आता हे पाणी दुर्वा किंवा आंब्याच्या पानाने मुख्य प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, देवघर आणि बेडरुममध्ये शिंपडा. गंगाजल आणि कापूर यांच्या मिश्रणामुळे घरातील नकारात्मकता संपते आणि वास्तुदोषही दूर होतो.
advertisement
घरात कापराचा धूर करा - सूर्यग्रहणानंतर संपूर्ण घरात कापूर जाळा आणि त्याचा धूर सगळीकडे पसरवा. देवघराची स्वच्छता करून तिथे दिवा आणि धूप लावा. मूर्ती कापडाने हळुवार पुसून घ्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते.
ग्रहणापूर्वी अन्नात तुळशीची पानं टाकण्याचा नियम - शिजवलेलं अन्न आणि पाणी यामध्ये ग्रहणातून निघणारी नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी प्रवेश करते. त्यापासून बचावासाठी त्यात तुळशीची पाने ठेवली जातात. सुतक काळ सुरू होण्यापूर्वीच शिजवलेलं अन्न, लोणची किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवा. अन्न, दूध, दही आणि पाण्यात तुळशीची पानं अवश्य टाका. ग्रहणाच्या काळात अन्न शिजवणं किंवा खाणं टाळावं, अन्यथा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदानुसार, तुळशीच्या पानांमुळे अन्नात बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि आपली रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते. ग्रहण संपल्यानंतर अन्नातील हे पान सेवन केल्यास ग्रहणाची नकारात्मकता दूर होते, असं मानलं जातं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याचा आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: सूर्यग्रहण लागण्याआधी जेवणामध्ये तुळशीची पानं ठेवण्याचा नियम का आहे? कसा होतो परिणाम
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement