Weekly Horoscope: सोमवती अमावस्येपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन साप्ताहिक राशीफळ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा सोमवती अमावस्येपासून सुरू होत आहे. या आठवड्यात सूर्यग्रहणाशिवाय काही शुभ योग तयार होत आहेत, राशीचक्रावर याचा शुभ-अशुभ परिणाम दिसून येईल. आठवडा कोणासाठी कसा असेल संपूर्ण साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
मेष (Aries) -मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आयुष्यात नवीन संधींची दारे उघडणारा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून खूप कष्ट करूनही तुम्हाला मनासारखं यश मिळत नसेल, तर या आठवड्यात परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची रखडलेली कामं आता पटापट पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ऑफिसमध्ये वातावरण चांगलं राहील आणि मोठ्या साहेबांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या मोठ्या कामाबद्दल तुमचं कौतुक किंवा सत्कार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ प्रगतीचा असून परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. ज्या व्यापाऱ्यांना व्यवसायात तोटा होत होता, त्यांना आता चांगला नफा मिळायला लागेल. नवीन व्यवसायाचे प्लॅन्स प्रत्यक्षात येतील. एकंदरीत कामाचा वेग वाढेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा खूपच शुभ असून मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. घरातलं वातावरण आनंदी राहील.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 6
advertisement
वृषभ (Taurus) -वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबाचा असणार आहे. तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. ठरवलेली कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. पण, करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तो भावनेच्या आहारी जाऊन किंवा गोंधळलेल्या अवस्थेत घेऊ नका, नाहीतर फायद्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. घरच्या बाबतीत घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील आणि कुटुंबातल्या व्यक्ती तुमचं कौतुक करतील. पण कोणालाही असं वचन देऊ नका जे नंतर पूर्ण करणं तुम्हाला कठीण जाईल. राजकारण किंवा समाजकारणात असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा शेवट खूप चांगला असून तुमचा मानसन्मान वाढेल. घरात एखादं कार्य ठरू शकतं. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगली बातमी मिळेल. फक्त बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.भाग्यशाली रंग: हिरवाभाग्यशाली अंक: 1
advertisement
मिथुन (Gemini) - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा जपून वागण्याचा आहे. तुम्हाला यश हवं असेल तर आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर ताबा ठेवावा लागेल. हा आठवडा थोडा चढ-उताराचा असल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच वेळ, पैसा आणि शक्ती यांचं नियोजन करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. नोकरी करणाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ऑफिसमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागतील. नको त्या अडचणी टाळायच्या असतील तर आपल्या कामात कोणाची ढवळाढवळ होऊ देऊ नका आणि स्वतःचं काम दुसऱ्यावर सोपवण्याची चूक तर करूच नका. ऑफिस असो वा घर, लोकांशी वाद घालण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या. सकारात्मक राहिलात तरच तुम्ही समोर येणारी आव्हानं पेलू शकाल. मनात नकारात्मक विचार आणू नका आणि सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. घरच्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर नात्यात दुरावा येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि प्रेमसंबंधात जपून पाऊल टाका.भाग्यशाली रंग: लालभाग्यशाली अंक: 5
advertisement
कर्क (Cancer) - कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच भाग्याचा ठरेल. करिअरमध्ये हवी तशी प्रगती आणि व्यवसायात चांगला नफा पाहायला मिळेल. तुमची सगळी नियोजित कामं वेळेवर पार पडतील. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्ही चैनीची एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. जमीन, गाडी किंवा घर घेण्याचे प्रयत्न सुरू असतील तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील. घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. मध्यंतरी एखादा जुना मित्र किंवा जवळची व्यक्ती भेटल्यामुळे खूप आनंद होईल. कामानिमित्त होणारे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल किंवा प्रमोशन हवं असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. आरोग्य चांगलं राहील. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे योग जुळून येतील. मुलांची चिंता मिटेल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.भाग्यशाली रंग: तपकिरीभाग्यशाली अंक: 3
advertisement
सिंह (Leo) - सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपलं आरोग्य आणि नाती या दोन गोष्टींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नातेवाईकांसोबत काही मुद्द्यावरून गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका. जमीन किंवा व्यवसायाशी संबंधित वाद असतील तर ते कोर्टात नेण्यापेक्षा चर्चेतून सोडवणं जास्त हिताचं ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये आपल्या विरोधकांपासून सावध राहावं, ते तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणाच्याही षडयंत्राला बळी पडू नका. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा असेल, त्यामुळे जोखमीची गुंतवणूक करणं टाळा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात कमी लागेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या, तरच तुमचं प्रेमजीवन सुखद राहील.भाग्यशाली रंग: तपकिरीभाग्यशाली अंक: 9
advertisement
कन्या (Virgo)कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतंही काम अर्ध्या मनाने करू नये, अन्यथा झालेलं काम बिघडू शकतं. यश मिळवण्यासाठी आणि पैशांची तणचण भासू नये म्हणून आठवड्याच्या सुरुवातीलाच पैशांचं बजेट ठरवा. कोणत्याही कामात शॉर्टकट मारू नका किंवा नियम तोडू नका, नाहीतर नको त्या अडचणीत फसाल. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायासोबतच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची चिंता तुम्हाला सतावू शकते, ज्यामुळे धावपळ वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामासाठी घराबाहेर किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन ओळख करून देणारा आणि फायदेशीर ठरेल. जीवनात काही सकारात्मक बदल पाहायला मिळतील, पण सगळं व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर पारदर्शकता ठेवा. विशेषतः प्रेमसंबंधात जोडीदाराशी प्रामाणिक राहा. वैवाहिक आयुष्यात शांतता हवी असेल तर विनाकारण वाद घालणं टाळा.भाग्यशाली रंग: पिवळाभाग्यशाली अंक: 3
advertisement
तूळ (Libra)तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ आणि फायद्याचा असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या मोठ्या अडचणीशी लढत होता, ती आता सुटू शकते. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला हवं तसं यश मिळेल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील पण सोबत खर्चही वाढतील. आठवड्याच्या सुरुवातीला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमची समाजात मान उंचावेल. राजकारण आणि समाजकारणात असलेल्या लोकांची लोकप्रियता वाढेल आणि त्याचा फायदा भविष्यात नक्की होईल. आठवड्याचा उत्तरार्ध जास्त मजेत जाईल. तरुण मंडळी मित्रांसोबत फिरायला जाण्याचे किंवा पार्टीचे प्लॅन्स करतील. चैनीच्या वस्तूंवर थोडा जास्त खर्च होऊ शकतो. व्यावसायिकांना एखादा मोठा व्यवहार किंवा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरीत तुमचा दबदबा वाढेल आणि हाताखाली काम करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन खूप छान राहील.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 4
advertisement
वृश्चिक (Scorpio) - वृश्चिक राशीच्या लोकांनी जर छोट्या छोट्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं, तर हा आठवडा खूपच फलदायी ठरेल. जवळच्या लोकांच्या मदतीने तुमची ठरलेली कामं वेळेत पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कष्टाचं पूर्ण चीज या आठवड्यात होईल. तुम्हाला केवळ कामात यश मिळणार नाही, तर समाजात प्रतिष्ठाही वाढेल. जर तुम्ही व्यवसायात असाल, तर या आठवड्यात तुम्ही एखादा धाडसी निर्णय घेऊ शकता, जो व्यवसायाला उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा बिझनेस डील फायनल होऊ शकतो, पण तत्पूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. घरातले मालमत्तेचे वाद मोठ्यांच्या मध्यस्थीने मिटतील. महिलांचा कल धार्मिक कामांकडे जास्त असेल. दानधर्मात तुमचं मन रमेल. कुटुंबात प्रेम आणि एकोपा राहील आणि नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधांसाठी हा काळ खूपच रोमँटिक आणि सुखद असेल.भाग्यशाली रंग: आकाशी निळाभाग्यशाली अंक: 6
advertisement
धनु (Sagittarius) - धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. एखाद्या कामासाठी लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या शुभ कार्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुलांच्या बाबतीतली एखादी मोठी चिंता दूर होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. वडिलोपार्जित संपत्तीचे अडथळे दूर होऊन जमिनीचे व्यवहार सुरळीत होतील. पत्रकारिता, लेखन किंवा संवाद क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा खूप प्रगतीचा आहे. समाजात तुमचा मान वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन ओळखी होतील आणि मोठ्या लोकांशी संबंध येतील, ज्याचा फायदा भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी होईल. देवाधर्मात श्रद्धा वाढेल आणि तीर्थयात्रेचे योग येतील. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळेल.भाग्यशाली रंग: तपकरीभाग्यशाली अंक: 7
advertisement
मकर (Capricorn) - मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात स्वतःला वादापासून लांब ठेवणंच शहाणपणाचं ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा बोजा वाढल्यामुळे तुम्हाला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतील. कामाच्या टेन्शनमुळे थोडा ताण जाणवेल. व्यावसायिकांनी या आठवड्यात सावध राहावं, कामात चढ-उतार येऊ शकतात. कोणताही नियम मोडू नका आणि कागदपत्रं नीट तपासूनच पुढचं पाऊल टाका, नाहीतर सरकारी कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात धावपळ जास्त होऊनही कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडी निराशा किंवा थकवा येऊ शकतो. अशा वेळी लोकांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शांतता राहावी असं वाटत असेल तर छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जोडीदाराशी किंवा सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळा. प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा आणि दिखावा करू नका.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 1
advertisement
कुंभ (Aquarius) - कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली छोटी छोटी कामं पूर्ण करण्यासाठी सुद्धा बरीच धावपळ करावी लागेल. तुमची कामं थोडी सावकाश होतील, पण ती नक्की पूर्ण होतील. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल. भागीदारीतल्या व्यवसायात जे काही वाद होते, ते एखाद्या जुन्या मित्राच्या मध्यस्थीने चर्चेतून मिटतील. व्यवसायाबद्दल तुम्ही एखादा मोठा निर्णय या आठवड्यात घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळेल. तुमची लोकांमधली ओळख आणि लोकप्रियता वेगाने वाढेल. आठवड्याच्या दुसऱ्या भागात तुम्ही घराच्या सजावटीवर किंवा चैनीच्या वस्तूंवर बराच खर्च कराल. आईच्या बाजूने म्हणजेच आजोळकडून काही फायदा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि तुमचं म्हणणं समाजात मान्य केलं जाईल.भाग्यशाली रंग: हिरवाभाग्यशाली अंक: 6
advertisement
मीन (Pisces) - मीन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात प्रवासाने होऊ शकते. जर तुम्ही परदेशाशी संबंधित काम करत असाल किंवा बाहेर करिअर करायचा विचार करत असाल, तर परदेशवारीचे योग येतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ या आठवड्यात तुमच्या पदरात पडेल. नोकरीत तुमचे बॉस तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुम्हाला वरिष्ठांकडून बरंच काही शिकायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आणि तुमची बचत वाढेल. हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही तर आध्यात्मिक बाबतीतही प्रगतीचा ठरेल. एकीकडे व्यवसायात नफा आणि नोकरीत बढतीचा आनंद मिळेल, तर दुसरीकडे तुमचं मन समाजसेवा आणि धार्मिक कार्यात रमेल. एखाद्या मोठ्या संस्थेशी जोडून घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबात सुख-शांती आणि प्रेम टिकून राहील. भावंडांची साथ मिळेल. तुमचं प्रेमप्रकरण अधिक घट्ट होईल आणि तब्येतही उत्तम राहील.भाग्यशाली रंग: निळाभाग्यशाली अंक: 2







