advertisement

'मला माझं अस्तित्व...' प्रेमाचं गाजर दाखवून विशालने दिला धोका? रुचिताने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात विशाल आणि रुचिता यांच्यात प्रेमाचे वारे वाहू लागले होते. पण हे वारे अर्ध्यातच थांबलेत. रुचिताने घेतला मोठा निर्णय.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सध्या प्रेमाला उधाण आलं आहे. रुचिता आणि विशाल यांच्यातील नातं प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कालपर्यंत जवळीक दाखवणारे हे दोघे आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. घरात सुरुवातीला रुचिताने स्वतः कबूल केलं होतं की तिचं विशालबरोबर अटॅचमेंट तयार झालं आहे. "मला तो आवडतो, त्याची प्रेझेन्स मला आवडते". असं ती म्हणाली होती. या विधानानंतर दोघांची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर एका टास्कदरम्यान विशालनेही स्पष्ट शब्दांत प्रेमाची कबुली दिली. "मला रुचिता आवडते. आमच्या वयात किती अंतर आहे याने मला फरक पडत नाही", असं तो म्हणाला होता. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खास सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या.
मात्र आता चित्र बदललेलं दिसत आहे. आजच्या एपिसोडमध्ये रुचिता टोळीचा गेम पलटवताना दिसणार आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता विशालला म्हणते, उद्यापासून मी इंडिविज्युअल प्लेअर. तिच्या या निर्णयाने विशाल नाराज होतो. तो तिला म्हणतो, "तुम्ही फक्त टोळी टोळी करता. टोळीची सर्वात जास्त गरज तुम्हा तिघांना आहे, मला नाही".
advertisement
रुचिताने मात्र तिच्या भूमिकेवर ठाम राहते. ती स्पष्टपणे सांगते, "टोळी हा शब्द सोडूनही मला माझं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे". विशाल म्हणतो, "तुमच्या डोक्यात घातलं लोकांनी. रुल्सच्या अगेस्ट सगळं डिस्कस करत होते."



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
यावर रुचिताने शांतपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, "हो, सगळे डिस्कशन करत होते पण मला त्यात नाही यायचं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की नॉमिनेशन डिस्कशनमुळे उठवलंय. मला ती गोष्ट रिपीट नव्हती करायची." रुचिताच्या निर्णयावर अखेर विशाल तिला म्हणतो, "उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा मी माझं खेळतो."
या संभाषणातून हे दिसून येत आहे की विशाल आणि रुचिता यांच्यात दुरावा येत आहे.  विशालने प्रेमाचं गाजर दाखवत गेम खेळला का? की हा दोघांचा गेम होता? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. आता टोळीशिवाय रुचिता कशी खेळणार हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला माझं अस्तित्व...' प्रेमाचं गाजर दाखवून विशालने दिला धोका? रुचिताने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement