advertisement

Perfume Day Special : एक परफ्यूमच्या बॉटलसाठी विकावे लागेल घर! हजारोचा एक थेंब, पण एवढा महाग का?

Last Updated:
Perfume Day 2026 : दरवर्षी 17 फेब्रुवारीला परफ्यूम डे साजरा केला जातो. आजच्या दिवशी काही लोक हे नात्यातील लोकांना परफ्यूम गिफ्ट देतात. पण जगातील सर्वात महागडा परफ्यूम कोणता आहे तुम्हाला माहितीये का? तसंच याची किंमत किती आहे? काही परफ्यूमची किंमत एवढी असते की, ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला घरही विकावे लागू शकते.
1/7
तुम्हाला माहिती असेल की खुपच भारी परफ्यूमची किंमत ही 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत असते. काही अल्टा लग्जरी परफ्यूमही आहेत. ज्यांकी किंमत लाखांपर्यंत जाते. पण तुम्हाला कोणी म्हटलं की, जगातील काही परफ्यूमची लहानशी बॉटल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1 कोटींहून जास्त पैसे द्यावे लागतील. तर तुम्ही हैराण व्हाल.

2/7
जगातील सर्वात महागड्या परफ्यूमविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये पहिल्या नंबरवर शुमुख येते. नबील परफ्यूम्सद्वारे दुबईमध्ये लॉन्च केलेले शुमुक जगातील सर्वात पहिले परफ्यूम्समधून एक मानले जाते. याची किंमत जवळपास 12.9 लाख डॉलर म्हणजेच 11.7 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.3 लिटरच्या या बॉटलला 3,500 पेक्षा जास्त हिरे, मोती, सोनं आणि चांदीने सजवलं आहे. याच्या सुंगधात अगरवुड (ऊद), चंदन, कस्तूरी, तुर्की गुलाब आणि एम्बरचा समावेश आहे. खरंतर इंडस्ट्री एक्सपर्ट्स म्हणतात की, याच्या किंमतीचा सर्वात मोठा भाग हा हाताने तयार केलेली ज्वेलरीने सजवलेल्या बॉटलवर लागला आहे.

3/7
सर्वात महागड्या परफ्यूमच्या यादीत DKNY गोल्डन डेलिशियस मिलियन डॉलर फ्रॅग्रन्स बॉटल दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2011 मध्ये लाँच झालेले हे परफ्यूम DKNY च्या लिमिटेड व्हर्जनच्या गोल्डन डेलिशियस परफ्यूमचे एक विशेष रूप होते. त्याची किंमत 10 लाख डॉलर  (अंदाजे ९ कोटी रुपये) असल्याची माहिती आहे. सफरचंदाच्या आकाराच्या बाटलीवर जगभरातून आणलेल्या सुमारे 3,000 मौल्यवान दगडांचा वापर करण्यात आला होता. आतील सुगंध ब्रँडच्या रेग्युलर फॉर्म्यूल्यासारखाच होता, परंतु रत्नांच्या कारागिरीमुळे त्याची किंमत वाढली.

4/7
यादीत तिसऱ्या क्रमांकावर क्लाइव्ह ख्रिश्चन नंबर 1 इम्पीरियल मॅजेस्टी आहेत. या एडिशनच्या फक्त 10 बाटल्या तयार करण्यात आल्या. प्रत्येक बाटली बाकारा क्रिस्टलपासून बनलेली आहे, ज्यामध्ये पाच कॅरेटचा हिरा आणि 18 कॅरेटचा सोन्याचा कॉलर आहे. सुरुवातीला, प्रति बाटलीची किंमत 2.15 लाख डॉलर इतकी होती, जी सध्याच्या विनिमय दरानुसार अंदाजे 1.9 कोटी रुपये इतकी आहे. महागडे हिरे आणि सोन्याचे जडणघडण यामुळे किंमत आणखी वाढते.

5/7
महागड्या परफ्यूमच्या या लिस्टमध्ये पुढचं नाव बकारा लेस लार्म्स सॅक्रे डि थेब्सचं येतं. 1990 च्या दशकात तयार केलेली ही लिमिटेड एडिशन परफ्यूम पिरामिडच्या आकाराच्या क्रिस्टल बॉटलमध्ये सादर करण्यात आले आहेत. यामध्ये लोबान आणि गंधरसचा सुगंध होता. जो प्राचीन धार्मिक परंपरांशी प्रेरित होता. मर्यादित संख्येत उत्पादन आणि हाताने तयार केलेल्या क्रिस्टल डिझाइनने त्याची किंमत वाढवली. जी जवळपास 56 लाख रुपये सांगण्यात येत होती.

6/7
तुम्ही विचार करत असाल की या परफ्यूममध्ये असं काय आहे तर यांची किंमत कोट्यवधीपर्यंत जात असेल तर हिरे, सोनं , प्लॅटिनम आणि खास क्रिस्टल वर्क अनेकदा परफ्यूमपेक्षा जास्त बॉटल महागडी असते. या व्यतिरिक्त ऊद, नॅच्युरल एम्बरग्रीस आणि हाय-ग्रेड गुलाबाचं ऑइल परफ्यूम इंडस्ट्रीची सर्वात महाग साहित्य आहे. जे यामध्ये वापरले जाते. काही एडिशन खुप कमी संख्येत तयार केले जातता. ज्यामुळे त्याची एक्सक्लूसिव्हिटी आणि रीसेल व्हॅल्यू वाढते.

7/7
भारतातील परफ्यूम बाजारपेठ अंदाजे 12 हजार कोटी पर्यंत पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे, परफ्यूम उद्योग 15% पेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. 2030 पर्यंत तो 4 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 36 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. जगातील सर्वात प्रीमियम परफ्यूम ब्रँडपैकी एक असलेल्या क्लाइव्ह ख्रिश्चन नंबर 1 इम्पीरियल मॅजेस्टी परफ्यूमने भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक रणनीती विकसित केली आहे.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement