एकनाथ शिंदे अवमान प्रकरणानंतर कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, हक्कभंग समिती समोर हजेरी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
प्रवीण दरेकरांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावामुळे कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत आला आणि त्याने विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजेरी लावली.
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने 23 मार्च 2025 रोजी आपल्या स्टँडअप शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक आणि आक्षेपार्ह गाणे सादर केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. या घटनेनंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रकरणी आज विधानभवनातील हक्कभंग समितीसमोर सुनावणी होणार होती. मात्र, मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्यामुळे ही सुनावणी स्थगित करण्यात आली असून आता ती 10 मार्च रोजी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी कुणाल कामरा आज विधानभवनात उपस्थित राहिला होता.
प्रवीण दरेकरांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावामुळे कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत आला आणि त्याने विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजेरी लावली. त्यावेळी सुषमा अंधारेदेखील होत्या. पण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी आता 10 मार्च रोजी पुढची सुनावणी होणार आहे. सुनावणी पुढे ढकलल्यानंतर कुणाल कामराने प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. तसेच जनतेला तुमचं बोलणं पटतं मात्र सत्ताधाऱ्यांना का पटत नाही? या प्रश्नावर बोलताना कुणालने म्हटले की, सत्ताधाऱ्यांना जे आवडत ते मी का बोलू. यासाठी दुसरे लोक आहेत.
advertisement
मुंबईत पुन्हा कॉमेडी शो आयोजित करणार का?
मुंबईत पुन्हा कॉमेडी शो आयोजित करणार का? या प्रश्नावर कुणालने म्हटले की, ‘मी नक्कीच आयोजित करणार आहे.’ त. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुणाल कामरा म्हणाला, मला 10 मार्चला पुन्हा बोलावण्यात आले आहे. तेव्हा मी निश्चित येईन. मुंबईत मी सुरक्षित आहे. मी संविधानाचा शर्ट घातला आहे, कारण मला संविधानावर पूर्ण विश्वास आहे.
advertisement
सुषमा अंधारे काय म्हणाले?
दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आज तक्रारदार प्रवीण दरेकर उपस्थित नसल्यामुळे साक्ष झाली नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा हजर राहावे लागेल. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे संविधानानुसार मी लढत राहील
सुनावणी पुढे का ढकलली?
एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी कुणाल कामरा तसेच याप्रकरणी भूमिका मांडल्याबद्दल सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या दोघांचे जबाब आज समितीपुढे नोंदवले जाणार होते. मात्र, तक्रारदारच अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे अवमान प्रकरणानंतर कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, हक्कभंग समिती समोर हजेरी









