advertisement

'माझ्यासारखे कलाकार...', जॉन अब्राहमने अभिषेक बच्चनला केलेलं KISS, इंडस्ट्रीतील दुजेभावावर मांडलं सडेतोड मत

Last Updated:
John Abraham: बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम हा त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातोच, पण सध्या तो त्याच्या एका मजेशीर आणि तितक्याच धाडसी विधानामुळे चर्चेत आला आहे.
1/9
मुंबई : बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम हा त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातोच, पण सध्या तो त्याच्या एका मजेशीर आणि तितक्याच धाडसी विधानामुळे चर्चेत आला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम हा त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातोच, पण सध्या तो त्याच्या एका मजेशीर आणि तितक्याच धाडसी विधानामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/9
'दोस्ताना' चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतची त्याची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, पण आता जॉनने असं काही म्हटलंय की सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.
'दोस्ताना' चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतची त्याची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, पण आता जॉनने असं काही म्हटलंय की सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.
advertisement
3/9
 "मी अभिषेक बच्चनला चक्क 'किस' केलंय," असं म्हणत जॉनने सहकलाकारांसोबतच्या आपल्या बॉन्डिंगवर भाष्य केलं आहे.
"मी अभिषेक बच्चनला चक्क 'किस' केलंय," असं म्हणत जॉनने सहकलाकारांसोबतच्या आपल्या बॉन्डिंगवर भाष्य केलं आहे.
advertisement
4/9
यावेळी अभिषेक बच्चन, वरुण धवन यांसारख्या सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवावर तो म्हणाला,
यावेळी अभिषेक बच्चन, वरुण धवन यांसारख्या सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवावर तो म्हणाला, "माझं काम प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आहे. सहकलाकारांसोबत काम करताना मी कधीही स्पर्धा केली नाही. उलट, मी त्यांच्याशी मैत्रीचं नातं जपलं. तुम्हाला सांगू का, मी तर पडद्यावर अभिषेक बच्चनला किस सुद्धा केलंय!"
advertisement
5/9
जॉनने हे विधान हसत हसत केलं असलं, तरी त्यातून त्याची त्याच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि सहकलाकारांशी असलेलं घट्ट नातं दिसून येतं.
जॉनने हे विधान हसत हसत केलं असलं, तरी त्यातून त्याची त्याच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि सहकलाकारांशी असलेलं घट्ट नातं दिसून येतं.
advertisement
6/9
२००३ मध्ये जेव्हा जॉनने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हाची परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. बाहेरून आलेल्या कलाकारांसाठी (Outsiders) हे क्षेत्र सोपं नव्हतं.
२००३ मध्ये जेव्हा जॉनने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हाची परिस्थिती आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. बाहेरून आलेल्या कलाकारांसाठी (Outsiders) हे क्षेत्र सोपं नव्हतं.
advertisement
7/9
जॉन सांगतो,
जॉन सांगतो, "माझ्या काळात माझ्यासारखे बाहेरून आलेले कलाकार खूप कमी होते. फक्त अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांनीच कुठल्याही गॉडफादरशिवाय स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. मी सुरुवातीला इतकी टीका सहन केली की, कदाचित इतर कोणालाही ती सहन करावी लागली नसेल. पण मी कधीही मीडियामध्ये स्वतःचं मार्केटिंग केलं नाही, फक्त प्रामाणिकपणे काम करत राहिलो."
advertisement
8/9
सध्या अ‍ॅक्शन आणि व्हिलनच्या भूमिकेत दिसणारा जॉन आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या कॉमेडी जॉनरकडे वळण्यास उत्सुक आहे. त्याने सांगितलं की, तो सध्या एका चांगल्या कॉमेडी स्क्रिप्टच्या शोधात आहे.

9/9
तसेच, जर अनुराग कश्यपच्या 'नो स्मोकिंग' चित्रपटाचा सिक्वेल आला, तर त्यात काम करायला त्याला सर्वात जास्त आवडेल. चर्चा तर अशीही आहे की, जॉन लवकरच रोहित शेट्टीच्या 'कॉप युनिव्हर्स'मध्ये किंवा एखाद्या मोठ्या अ‍ॅक्शन धमाक्यात दिसू शकतो.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement