advertisement

Nashik Police Bharati: नाशिकमध्ये होतेय जम्बो पोलीस भरती, केव्हा होणार उमेदवारांची फिजिकल टेस्ट? सर्व अपडेट क्लिकवर

Last Updated:

नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस दलासाठी ग्रामीण पोलीस दलामध्ये रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. नाशिकमध्ये तरुण- तरुणींची फिजिकल टेस्ट केव्हा होणार आहे, जाणून घेऊया...

News18
News18
नाशिक: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तरूणांनो जर तुम्ही खाकी वर्दीचं स्वप्न पाहात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रिक्त पोलीस शिपाई पदांची भरती केली जात आहे. या भरतीची येत्या 20 फेब्रुवारीपासून (शुक्रवार) काही रिक्त पदांसाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. अवघे काही महिनेच शिल्लक राहिले असताना त्याआधी राज्य सरकारकडून जोरदार तयारी केली जात आहे. नेमक्या कोण कोणत्या पदांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची भरती केली जाणार आहे, जाणून घेऊया...
नाशिक ग्रामीण पोलीस दल शिपाई, ड्रायव्हर आणि मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपायांच्या रिक्त पदांसठी भरती केली जाणार आहे. या तिन्ही पदांच्या 380 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपायांसाठी 210 रिक्त पदे, ड्रायव्हरसाठी 52 रिक्त पदे आणि मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपायांसाठी 118 रिक्त पदे अशा रिक्त जागा आहेत. अशा एकूण 380 रिक्त जागा आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नेमकी ही पोलीस भरती कोणत्या ठिकाणी होणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या भरतीसंबंधीतची अधिसुचना जारी केलेली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामीण पोलिस दलामध्ये जम्बो मेगाभरती केली जात आहे. देशासह जगभरातून करोडोंच्या संख्येने भाविक नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पोलिसांची भरती केली जात आहे. यापूर्वी 2023 मध्ये 150, तर 2024 साली 32 जागांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. दरम्यान 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरतीसाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.
advertisement
भरती प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. धावणे, बॉडी चेकअप, डॉक्युमेंट व्हेरिफेकशन, गोळाफेक अशा मैदानी चाचणी पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तरुण- तरुणी या भरतीची तयारी करत होते. आता त्या सर्वांचे लवकरच खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Police Bharati: नाशिकमध्ये होतेय जम्बो पोलीस भरती, केव्हा होणार उमेदवारांची फिजिकल टेस्ट? सर्व अपडेट क्लिकवर
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement