advertisement

TCS ने सादर केली स्मार्ट कार! झोप आल्यावर हलवेल सीट, स्वतःच होईल पार्क 

Last Updated:

AI Impact Summit 2026: येथे गर्दीमध्ये एक कार सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पण भारी दिसण्यासोबतच या कारचे फीचर्सही तितकेच जबरदस्त आहेत. चला पाहूया टीसीएसच्या स्मार्ट कारविषयी सविस्तर...

टीसीएस कार
टीसीएस कार
AI Impact Summit 2026: नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या AI Impact Summit 2026 मध्ये जगभरातील प्रसिद्ध टेक कंपन्या आपली ताकद दाखवत आहे. दरम्यान Tata Consultancy Services म्हणजेच टीसीएसच्या एका खास कारची खुप चर्चा सुरु आहे.ही कार AI Level 5 टेक्नॉलॉजीने सुसज्ज असल्याचे वृत्त आहे. तर लोकप्रिय टेस्ला कार सध्या Level 4 पर्यंत मर्यादित आहेत. या AI Level 5 सिस्टीमचा अर्थ असा आहे की कार पूर्णपणे स्वायत्त मोडमध्ये स्वतःचे निर्णय घेऊ शकते. म्हणूनच हे मॉडेल एआय समिट दिल्लीमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
AI Impact Summit मध्ये TCS कारची हवा 
TCS चे प्रतिनिधी अभिषेक यांच्यानुसार ही कार फेस रीडिंग सिस्टमने सुसज्ज आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून सिस्टम अॅक्टिव्हेट होते. ड्रायव्हरला झोप येत असेल तर सीट थोडेसे हलवून त्याला ड्रायव्हरला जागे करते.
advertisement
एखाद्याची तब्येत खराब असेल किंवा ड्रायव्हरला हार्ट अटॅकसारखा धोका असेल तर कार स्वतः सेफ्टी लेन किंवा पार्किंगमध्ये उभी होऊ शकते. फॉग सारखी खराब व्हिजिबिलिटीही ही कार अडव्हान्स राडार सेन्सरच्या माध्यमातून रस्ता ओळखून सुरक्षित चालू शकते. लाईव्ह प्रात्यक्षिकातून हे स्पष्ट झाले की भारत आता केवळ वाहनांच्या निर्मितीतच नाही तर भविष्यातील ऑटो तंत्रज्ञान विकसित करण्यातही पुढे जात आहे.
advertisement
जगातील कार कंपन्यांना एआय सपोर्ट
TCS चा दावा आहे की, ते जगातील मोठ्या कार कंपन्यांना AI technology पुरवत आहेत. भारत आता फक्त सॉफ्टवेयर सर्व्हिसपर्यंत मर्यादित नाही. तर अडव्हान्स ऑटोमोबाईल AI टेक्नॉलॉजीमध्येही आपली दावेवारी सादर करत आहे. AI Impact Summit 2026 मध्ये TCS च्या लॅब कारने सिद्ध केलेय की, भारतीय टेक कंपन्या आता ग्लोबल रेसमध्ये मागे नाहीत. Tesla सोबत तुलना असो किंवा AI Level 5 विषयी बोलणं असोत. भारताचं नाव या प्रवासात घेतलं जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
TCS ने सादर केली स्मार्ट कार! झोप आल्यावर हलवेल सीट, स्वतःच होईल पार्क 
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement