advertisement

Shocking Crime : आई-वडीलच झाले वैरी! 17 वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने..; नराधम पतीसह 5 जणांवर गुन्हा

Last Updated:

Alandi Crime News : आळंदीत अवघ्या 17 वर्षांच्या आदिवासी मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून तिच्यासोबत भयंकर घडलं आहे.सध्या पोलिसांनी पती, आई-वडिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

१७ वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने संसाराच्या जाळ्यात ढकलले;
१७ वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने संसाराच्या जाळ्यात ढकलले;
आळंदी : ज्या वयात 17 वर्षांच्या मुलीच्या हातात पुस्तकं असायला हवीत, त्या वयात त्या मुलीच्या नशिबी असं काही घडलं ते माहिती नव्हतं. नुकतीच समाजाला आणि नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना ही चहोली खुर्द येथून समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा तिच्याच आई-वडिल आणि जवळच्या नातेवाइकांनी जबरदस्ती बालविवाह लावून दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढ्यावरच न थांबता लग्नानंतर सासरी तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, ज्यामुळे मुलगी अवघ्या 17 वर्षी आई झाली आहे.
नराधम पतीसह 5 जणांवर गुन्हा
या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तातडीने पावले उचलत पीडित मुलीचा पती,सासू-सासरे, तिचे आई-वडील आणि मामा अशा तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण तरी काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकार हा 26 मे 2024 ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान चहोली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे. पीडित मुलगी फक्त 17 वर्षे 2 महिन्यांची होती. ना तिचे लग्नासाठी योग्य वय हे माहिती असूनही तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने लग्नाच्या गाड्यात ढकलले. लग्नानंतर तिच्या पतीकडून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. त्याच अत्याचारामुळे पीडित मुलगी ही गरदोर राहिला आणि तिने एका चिमुरडीला जन्म दिला.
advertisement
स्वत:च्या आई-वडिलांनी निरागस मुलीचे आयुष्य हे उद्ध्वस्त केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. शिवाय आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सर्व आरोपींनी कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shocking Crime : आई-वडीलच झाले वैरी! 17 वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने..; नराधम पतीसह 5 जणांवर गुन्हा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement