advertisement

Marathi vs Gujarathi : घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती राडा; केवळ शौचालय वापरल्याच्या कारणावरून मराठी व्यावसायिकाला चोपले

Last Updated:

Marathi vs Gujarathi Clash News : घाटकोपमधून एक संतापजनक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आलेली आहे. जिथे एका क्षुल्लक कारणावरुन मराठी माणसाला गुजराती व्यापाराकडून मारहाण करण्यात आलेली आहे.

टकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; गुजराती व्यापाऱ्याची अरेरावी.
टकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; गुजराती व्यापाऱ्याची अरेरावी.
मुंबई : मुंबई शहरात प्रत्येक प्रांताचे नागरिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही वर्षात मराठी-गुजराती वाद चर्चेत आला आहे ज्यात सोसायटीमध्ये घर देण्यावरुन तर कधी अन्य कारणांवरुन असून आता पु्न्हा तो वाद एका समोर आला आहे. नुकतच घाटकोपर शहरामध्ये सार्वजनिक शौचालय वापरल म्हणून फक्त गुजराती व्यवसायिकांनी एका मराठी व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून मनसेनेही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
मुंबईत मराठी माणसावरच अन्याय?
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच एक सोसायटी आहे. तिथं महापालिकेच्या बाजार विभागाचे प्रकल्प धारकांचे कार्यालय आहे तर दुसऱ्या मजल्यावर अक्षय भांगरे यांचे प्रतीक्षा एजन्सीचे कार्यालय देखील आहे. साधारण दीड वर्षांपासून ते भाड्याने घेतलेल्या कार्यालयात व्यवसाय करतात. मात्र त्यांच्या कार्यालया जवळ असलेले गुजराती व्यावसायिक झिन गडा आणि निखिल डोमाडीय त्यांना त्रास देत आहेत. धक्कादायक म्हणजे ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी अक्षय यांनी सार्वजनिक शौचालय वापरले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली.
advertisement
या घटनेबाबत अक्षय यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार करुन अदखपात्र गुन्हा नोंदवला आहे. पण आता मुंबई मनपाच्या बाजार विभागाने अनेक कारणं देत जागेचे मूळ मालक यांना नोटीस बजावली आहे शिवाय अक्षय हे अनधिकृत भाडेकरुन असल्याने त्यांनाही तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहे.
या घटनेमुळे मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांची गडा यांच्या तेथील कार्यालयावर धडक दिली. मात्र त्यांचे कार्यालय तेव्हा बंद होते. पण त्यांनी कार्यालयाबाहेर ''मुंबईत फक्त मराठी'' असे लिहीत आंदोलनाचा थेट इशारा दिला आहे.
advertisement
दोषी अधिकाऱ्यांची गय करू नका
मनसेच्या वतीने त्या मुजोर गुजराती व्यावसायिकांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो,मात्र त्यांनी पळ काढला. त्यांच्या दुकानावर एक संदेश लिहून आलो आहोत. पण यातूनही ते सुधारले नाहीत तर तीव्र आंदोलन करु.शिवाय महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी कार्यालय रिकामे करण्याची नोटीस दिली आहे,त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी,असे मनसेचे अभिषेक सावंत यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Marathi vs Gujarathi : घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती राडा; केवळ शौचालय वापरल्याच्या कारणावरून मराठी व्यावसायिकाला चोपले
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement