Avesh Khan Controversy : आवेश खानची चूक नव्हती? 5 रन्सच्या पेनल्टीवर काय म्हणाले अंपायर अनिल चौधरी? थेट ICC चा नियम सांगितला
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Umpire On Avesh Khan hit ball controversy : पाच रन्सची पेनल्टी लावणं गरजेचं नव्हतं कारण फिल्डिंग साईडची कोणतीही गैरसोय झाली नव्हती. कारण तिथं कोणताही फिल्डर उपस्थित नव्हता, असं अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे.
Umpire Anil Chaudhary Explained ICC rule : रविवारी डबल हेडरमध्ये लखनऊ सुपर जाएन्टस आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना खेळवला गेला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊने विजय मिळवला. मात्र, शेवटच्या बॉलवरून वाद पेटल्याचं पहायला मिळालं. लखनऊच्या आवेश खानने ऋषभ पंतने मारलेला विनिग फोर पुन्हा मैदानात टोलवला होता. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. अशातच अंपायर अनिल चौधरी यांनी आवेश खानला क्लिन चीट दिली आहे अन् त्यांनी याचं कारण देखील सांगितलं.
काय म्हणाले अंपायर अनिल चौधरी?
आवेश खानने थोडं आधीच सेलीब्रेशन केलं. त्याआधी देखील त्याने एक चूक केली होती. आरसीबीच्या मॅचमध्ये त्यान हेलमेट जमिनीवर आदळलं होतं. त्यावेळी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. आताच्या प्रकरणात पाच रन्सची पेनल्टी लावणं गरजेचं नव्हतं कारण फिल्डिंग साईडची कोणतीही गैरसोय झाली नव्हती. कारण तिथं कोणताही फिल्डर उपस्थित नव्हता, असं अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे.
advertisement
advertisement
आवेश खानला इशारा
जर आवेश खानने मॅचच्या मध्येच बॉल मारला असता, त्यावेळी डॅमेजिंग द बॉल या कॅटेगरीमध्ये केस आली असती. पण हा मॅचचा शेवटचा बॉल होता. खुप रेअर केसमध्ये यावर कारवाई झाली असती, असं देखील अनिल चौधरी म्हणाले. हा एवढा मोठा मुद्दा नव्हता पण आवेश खानला यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं म्हणत अनिल चौधरी यांनी आवेश खानला सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
झालं असं की, मॅचचे शेवटचे दोन बॉल बाकी असताना, लखनऊचा कॅप्टन ऋषभ पंत याने विनिंग शॉट मारला पण डगआऊटमध्ये बसलेल्या आवेश खानने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापूर्वीच बॅटने पुन्हा मैदानाच्या दिशेने मारला. त्याला बॅटिंग करण्याची इच्छा होती पण त्याला बॅटिंग न मिळाल्याने त्याने अशी कृती केली, असं त्याने एका व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यावर बीसीसीआयने देखील कोणतीही कारवाई केली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 8:44 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Avesh Khan Controversy : आवेश खानची चूक नव्हती? 5 रन्सच्या पेनल्टीवर काय म्हणाले अंपायर अनिल चौधरी? थेट ICC चा नियम सांगितला









