कापड हटवण्यासाठी मंडपावर चढला, रवीसोबत भयंकर घडलं, सोलापूर हळहळलं
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur News: घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने पवार कुटुंबीय जय्यत तयारी करत होते. त्यासाठी दारात मंडप उभारण्यात आला होता.
सोलापूर: घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने मंडप घातलेला होता. परंतु, लाइटच्या फोकससमोर आलेले कापड हटवण्यासाठी 16 वर्षांचा मुलगा मंडपावर चढला आणि भयंकर घडले. पाय घसरून पडल्याने रवी लक्ष्मण पवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने पवार कुटुंबीय जय्यत तयारी करत होते. त्यासाठी दारात मंडप उभारण्यात आला होता. त्यावर लावलेल्या फोकससमोर मंडपाचे कापड आले होते. त्यामुळे रवी कापड काढण्यासाठी मंडपावर चढला. त्याचा पाय घसरल्याने तो जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या.
advertisement
दरम्यान, या अपघातानंतर आई-वडिलांनी तातडीने रवीला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. रवीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील मिळेल ते काम करतात. हाताशी आलेला तरुण अशा दुर्घटनेत गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 8:35 AM IST









