advertisement

Weather Alert: महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, मंगळवारी अवकाळीचा धोका कमी, पण पुन्हा नवं संकट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. 7 एप्रिल रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रातील हवामानात एप्रिलमध्ये मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या महिनाभर अवकाळी संकटाचं सावट कायम होतं. आता मात्र राज्यावरील हे संकट टळणार आहे. 7 एप्रिल रोजी बहुतांश जिल्ह्यांत हवामान  कोरडे राहील. मात्र, विदर्भातील दोन जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता कायम आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा चढणार आहे. मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
मुंबईसह कोकणात आज हवामान मुख्यत: कोरडे राहील. तर काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे, पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32-34 अंशांपर्यंत राहील. हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवेल. समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी वारे वाहतील.

3/7
मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुणे, सोलापूरसह सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील अवकाळी संकट टळलं आहे. आज मुख्यत: हवामान कोरडे राहील. कमाल तापमानाचा पारा 37-39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषत: दुपारी उष्णतेची तीव्रता वाढेल.

4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील हवापालट झाल्याचं चित्र आहे. आज हवामान कोरडे ते अंशत: ढगाळ राहील. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये विजांसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही.

5/7
मराठवाड्यातील अवकाळी संकटाची तीव्रता कमी झाली आहे. नांदेड हिंगोलीमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 39-40 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहू शकते, पण पावसाची शक्यता कमी. काही भागात पाण्याची टंचाई जाणवू शकते.

6/7
विदर्भातील काही जिल्ह्यांत आज पुन्हा अवकाळी संकटाचा धोका आहे. विशेषत: चंद्रपूर, गडचिरोली भागात पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल. मात्र इतर जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. कमाल तापमान 41 ते 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा धोका आहे.

7/7
दरम्यान, महाराष्ट्रावरचं अवकाळी संकटाची तीव्रता कमी झाली असली तरी पुन्हा नव्या संकटाचा धोका आहे. आता उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. विदर्भ आणि उत्तर, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका असल्याने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement