advertisement

Tomato Recipe Video : टोमॅटोत बेसन घालून अफलातून चवीचा पदार्थ; पोट भरेल पण मन भरणार नाही

Last Updated:

Tomato Recipe Video : टोमॅटोपासून एकदम नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी जी कदाचित याआधी तुम्ही खाल्ली नसेल, पाहिली नसेल किंवा माहितीही नसेल. टोमॅटोच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
टोमॅटो आपण डाळ, भाजी, आमटीमध्ये फोडणीसाठी वापरतो. टोमॅटोची चटणीही बनवली जाते. पण याच टोमॅटोपासून एकदम नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी जी कदाचित याआधी तुम्ही खाल्ली नसेल, पाहिली नसेल किंवा माहितीही नसेल. टोमॅटोच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
टोमॅटोमध्ये बेसन घालून केलेला हा पदार्थ आहे. जो खाल्ला तर पोट भरेल पण मन भरणार नाही, चव इतकी भारी की पुन्हा पुन्हा खाल, असा दावा ही रेसिपी दाखवणाऱ्या महिलेने केला आहे. आता अशी ही टोमॅटो-बेसनची रेसिपी नक्की आहे तरी काय हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल. चला आता थेट रेसिपी पाहुयात.
advertisement
मध्यम आकाराचे लाल कडक टोमॅटो घ्या. स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्याचा देठाकडचा भाग गोलाकार कापून घ्या आणि टोमॅटोच्या आतील बिया काढून घ्या. ज्याप्रमाणे भरली शिमला मिरची करण्यासाठी आपण करतो अगदी तसंच. टोमॅटोच्या बिया फेकायच्या नाहीत. आता अर्धी वाटी बेसन घ्या, त्यात थोडी हळद आणि चवीपुरत मीठ टाकून मिक्स करा.. थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार करून घ्या.
advertisement
मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा घ्या. त्याची साल काढून तो पाण्यात किसून घ्या. म्हणजे काळा पडणार नाही. स्वच्छ धुवून घट्ट पिळून घ्या. यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटोतून काढलेल्या बिया, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद,  पाव चमचा गरम मसाला, दोन चिमूट हिंग, अर्धा चमचा धने पूड, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळं मिश्रण एकत्र करून घ्या. हा आपला मसाला तयार झाला आहे. हा मसाला टोमॅटोमध्ये दाबून भरायचा आहे. पण टोमॅटो पूर्ण भरायचा नाही. वर थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे.
advertisement
गॅसवर कढई ठेवा. त्यात 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता घालून फोडणी करा. आता मसाला भरलेले टोमॅटो यात उभे ठेवायचे आहे. टोमॅटोचा सारण भरलेला भाग वरच्या बाजूला हवा. यामध्ये बेसन पीठाचं मिश्रण टाका. गॅसची फ्लेम मंद करून झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्या. नंतर झाकण काढून टोमॅटो परतून पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्या. अशा पद्धतीने सर्व बाजूने टोमॅटो नीट शिजवून घ्या.
advertisement
आता वरून शिल्लक राहिलेला मसाला घालून परतून घ्या. नंतर अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या.  ही भरल्या टोमॅटोची भाजी तयार झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tomato Recipe Video : टोमॅटोत बेसन घालून अफलातून चवीचा पदार्थ; पोट भरेल पण मन भरणार नाही
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement