Brinjal : भरली दूध वांगी, नाव वाचूनच चकीत झालात ना, बनवायची कशी पाहा Recipe Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bharli Vangi Recipe Video : वांग्याचे तेच तेच पदार्थ, त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आता ही वांग्याची वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
वांग म्हटलं की बटाटा वांगं, वांग्यांचे काप, वांग्याचे भरीत, भरली वांगी असे पदार्थ समोर येतात. भरली वांगी ज्यात कुणी ओलं वाटप तर कुणी सुका मसाला वापरतो. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी भरली दूध वांगी खाल्ली आहेत का?
भरली दूध वांगी... पदार्थाचं नाव वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. भरली दूध वांगी ही बनवायची कशी, कशी लागतील असे कित्येक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण वांग्याचे तेच तेच पदार्थ, त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आता ही वांग्याची वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती पाहुयात.
advertisement
भरली दूध वांगीसाठी साहित्य
8 वांगी
4 मध्यम आकाराचे कांदे
7-8 लसूण पाकळ्या
एक ग्लास दूध
एक लहान वाटी तेल
एक वाटी शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार लाल तिखट
चवीनुसार मीठ
चिमूटभर हळद
हिंग पूड
जिरं
मोहरी
advertisement
बारीक चिरलेली कोथिंबीर
भरली दूध वांगी कशी बनवायची?
भरली वांगी करण्यासाठी जशी आपण वांगी कापतो, तशीच थोडं देठ कापून मधून चिरून घ्या. आता कढईत फोडणीसाठी 3 चमचे तेल गरम करा. त्यात जिरं, मोहरी घाला. जिरं-मोहरी तडतडली की यात कांदा टाकून चांगला लालसर होईपर्यंत तेलात भाजून घ्या. आता यात ठेचलेली लसूण, हळद आणि हिंग घालून एकत्र करून झाकण ठेवून शिजवून घ्या.
advertisement
झाकण काढून पुन्हा परतून त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून 2 मिनिटं परता. यात तुम्हाला आवडेल इतकं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर टाकून थोडा वेळ शिजू द्या. हे झालं वांग्याचं सारण तयार. ते थंड झालं की वांग्यात भरून घ्या.
advertisement
पुन्हा कढईत एक चमचाभर तेल घ्या. त्यात मसाला भरलेली वांगी थोड्या थोड्या वेळाने परतून सगळ्या बाजूने चांगली भाजून घ्या. वांगी चांगली भाजली गेली की यात दूध ओता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या.
झाकण काढून वांगी परतून गरज असेल तर आणखी थोडं दूध टाकून झाकण ठेवून आणखी थोडा वेळ शिजवून घ्या.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Brinjal : भरली दूध वांगी, नाव वाचूनच चकीत झालात ना, बनवायची कशी पाहा Recipe Video








