Summer Drink : लिंबू सरबत आणि कोकम सरबतापेक्षा थोडं हटके, या उन्हाळ्यात ट्राय करा तीवळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Summer Drink Recipe : उन्हाळ्यात तुम्ही कोकम सरबत पित असाल तर आता यावेळी तीवळ हे कोकमाचं हे वेगळं, पारंपारिक ड्रिंक ट्राय करून पाहा.
उन्हाळा म्हटलं की शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त हवं. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडासारखी रसाळ फळं आणि सरबत, ज्युस पिण्याकडे लोकांचा कल असतो. बहुतेक लोक लिंबू सरबत, उसाचा रस, कैरीचं पन्हं, इतर फळांचे ज्युस आणि कोकम सरबत पितात. पण आता यापेक्षा हटके असं एक ड्रिंक जे कोकमापासून बनवतात, पारंपारिक आहे पण तरी अनेकांना माहिती नाही. ते म्हणजे तीवळं.
तीवळ ज्याला फुटी कढी किंवा तांबडी कढी असंही म्हटलं जातं. हे एक पारंपारिक, आंबट-गोड-तिखट असं ड्रिंक आहे. माहितीनुसार कोकणात आणि विशेषत: गोवा आणि कारवार भागात हे पेय बनवलं जातं. हा सोलकढीचाच एक प्रकार जो खोबऱ्याच्या दुधाशिवाय बनवला जातो. आता यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं बनवायचं पाहुयात.
advertisement
तीळवं बनवण्यासाठी लागणारं साहित्य
5-6 ताजे ओले कोकम किंवा आगळ
गुळाचा खडा किंवा साखर
एक-दोन हिरवी मिरची
एक लसूण पाकळी
एक लीटर पाणी
हिंग
मीठ
काळं मीठ
जिरं
मोहरी
कढीपत्ता
कोथिंबीर
बर्फाचे तुकडे
तीळवं कसं बनवायचं?
एका भांड्यात 5-6 ताजे ओले कोकम घ्या. त्यात गुळाचा एक खडा टाका. कोकमाऐवजी आगळ आणि गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. तिखटासाठी एक हिरवी मिरची मधे चिरून टाका. चवीनुसार मिरच्या वाढवू शकता. एक लसूण पाकळी ठेचून त्या टाका. आता यात एक लीटर पाणी ओतून त्यात पाव चमचा हिंग आणि चवीनुसार साधं मीठ टाकून ढवळून अर्धा तास झाकूण ठेवा.
advertisement
अर्धा तासानंतर पाण्यातच जिन्नस कुस्करून घ्या. आता हे पाणी गाळून घ्या. याला तुम्ही जिरं, मोहरी, कढीपत्ताची तेलात फोडणी करूनही देऊ शकता. यात गरजेनुसार पाणी, बर्फाचे तुकडेआणि कोथिंबीर, काळं मीठ टाकून सर्व्ह करा.
तीळवं पिण्याचे फायदे
जेवणानंतर अॅसिडीटी किंवा पोट फुगल्याची समस्या असेल तर हे ड्रिंक प्या आराम पडेल. तसंच उन्हाळ्यातील उकाड्यापासून संरक्षण करून शरीराला थंडावा देण्यातही मदत करतं.
Location :
Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Drink : लिंबू सरबत आणि कोकम सरबतापेक्षा थोडं हटके, या उन्हाळ्यात ट्राय करा तीवळ







