Gudhi Padwa 2026: गुढी पाडव्याचं राशीभविष्य आलं! राजा गुरू, मंगळ मंत्री; हिंदू नववर्ष या राशींना शुभफळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gudhi Padwa 2026: नवीन वर्ष जानेवारी महिन्यापासून सुरू होत असले तरी ते इंग्रजी कॅलेंडरनुसार असते. हिंदू परंपरेत वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होते. याच दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडव्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक उत्साहाने नवीन वस्तूंची खरेदी करतात, बाजारात या दिवशी उत्साहाचे वातावरण असते. वर्ष 2026 मध्ये हिंदू नववर्ष 19 मार्चपासून सुरू होत असून, यासोबतच विक्रम संवत 2083 ची सुरुवात होईल.
advertisement
हिंदू नववर्ष कधी सुरू होईल?हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होते. 2026 मध्ये ही तिथी 19 मार्च रोजी आहे. विक्रम संवत 2083 हे 19 मार्च 2026 पासून सुरू होऊन साधारण 10 मार्च 2027 पर्यंत असेल. या वर्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अधिक मासामुळे यावर्षी 12 ऐवजी 13 महिने असतील. ज्येष्ठ अधिक मास 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात असेल.
advertisement
advertisement
ग्रहांची स्थिती कशी असेल?हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य, शनि आणि शुक्र मीन राशीत असतील, तर गुरू मिथुन राशीत विराजमान असतील. राहू कुंभेत आणि केतू सिंह राशीत असतील. या वर्षातील सर्वात मोठा बदल म्हणजे 2 जून 2026 रोजी गुरू ग्रह उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करेल आणि 31 ऑक्टोबरला सिंह राशीत जाईल. तसेच 5 डिसेंबरला राहू मकर आणि केतू कर्क राशीत गोचर करतील.
advertisement
राशीचक्रावर काय परिणाम होईल?ज्योतिषीय अंदाजानुसार, हिंदू नववर्ष 2026 हे मिथुन, तूळ, धनु, मकर आणि मीन या राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी आणि आर्थिक सुधारणांचे योग आहेत. इतर राशींना मेहनतीनुसार फळ मिळेल, त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याकडे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास हे वर्ष सर्वांसाठी प्रगतीचे ठरू शकते.







