Dubai Airport Drone Attack: दुबईत विमानसेवा सुरू असताना ड्रोन हल्ला, एका भारतीयासह चार जण जखमी, इराणच्या हल्ल्याने खळबळ
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dubai Airport Drone Attack: जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (DXB) आज पुन्हा दोन ड्रोन कोसळल्याने एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली: जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (DXB) आज पुन्हा दोन ड्रोन कोसळल्याने एकच खळबळ उडाली. दुबई विमानतळावरून विमान सेवा सुरू असतानाच ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून यात एका भारतीय नागरिकासह एकूण चार जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, या घटनेचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून हवाई वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. इराणने इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणे सौदी अरेबिया, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती आदी शेजारच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. आज पुन्हा एकदा इराणने संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केल्याची चर्चा आहे. हा ड्रोन हल्ला इराणकडून थेट दुबईवर होता की अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
advertisement
नेमकी घटना काय?
दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेरील परिसरात हे दोन ड्रोन कोसळले. ड्रोन कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. यामध्ये, १ भारतीय नागरिकासह २ घानाचे नागरिक आणि एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. सर्व जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे.
Authorities confirm that two drones fell in the vicinity of Dubai International Airport (DXB) a short while ago, resulting in minor injuries to two Ghanaian nationals and one Bangladeshi national, and moderate injuries to one Indian national. Air traffic is operating as normal.
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 11, 2026
advertisement
विमान वाहतूक सुरळीत
घटनेनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला आणि तपास सुरू केला. ड्रोन कोसळले असले तरी विमानतळावरील कामकाज किंवा विमानांच्या उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे की, "विमानतळावरील एअर ट्रॅफिक पूर्णपणे सामान्य आहे आणि प्रवाशांना कोणताही धोका नाही."
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 11, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Dubai Airport Drone Attack: दुबईत विमानसेवा सुरू असताना ड्रोन हल्ला, एका भारतीयासह चार जण जखमी, इराणच्या हल्ल्याने खळबळ










