युद्धाचा सर्वात मोठा फटका! LPG च्या बुकिंग नियमात बदल, 21 नाही तर इतके दिवस वाट पाहावी लागणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग नियमात बदल केला आहे. आता दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. गॅस साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'मनीकंट्रोल'च्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांत गॅस वापराच्या पॅटर्नमध्ये विचित्र बदल दिसून आले होते. जे ग्राहक आधी सरासरी ५५ दिवसांनी सिलेंडर बुक करायचे, तेच ग्राहक अचानक १५-१५ दिवसांत बुकिंग करू लागले होते. यामुळे बाजारात गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती होती. ही 'पॅनिक बुकिंग' रोखण्यासाठीच सरकारने हा २५ दिवसांचा नियम सक्तीचा केला आहे.
advertisement
सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे, गॅस बुकिंगचे नियम बदलले असले तरी पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ करण्याचा सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने, जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती १३० डॉलर प्रति बॅरलच्या पार जात नाहीत, तोपर्यंत किमती वाढण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून सरकारने रिफायनरींना उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कमर्शियल कनेक्शनपेक्षा घरगुती गॅस कनेक्शनला प्राधान्य देण्याचे आदेश तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. यामुळे सामान्यांच्या स्वयंपाकावर इंधन संकटाचे सावट येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.







