advertisement

Pune Crime: पुण्याच्या आलिशान स्पा सेंटरमध्ये गेला व्यक्ती; आत जाताच दिसलं 'ते' धक्कादायक दृश्य, धावतच आले पोलीस

Last Updated:

पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनआयबीएम (NIBM) कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरातील एका आलिशान स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

स्पा सेंटरवर पोलिसांची धाड (प्रतिकात्मक फोटो- कॅनव्हा)
स्पा सेंटरवर पोलिसांची धाड (प्रतिकात्मक फोटो- कॅनव्हा)
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनआयबीएम (NIBM) कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरातील एका आलिशान स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 'ओपल स्पा अँड सलून' या नावाखाली चालणाऱ्या या अनैतिक व्यवसायातून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून, स्पा व्यवस्थापिकेला बेड्या ठोकल्या आहेत.
बनावट ग्राहकाद्वारे सापळा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली होती की, एनआयबीएम रस्त्यावरील 'सनश्री वुड्स कमर्शिअल प्रिमायसेस' इमारतीत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
नागालँडची व्यवस्थापिका अटकेत
या कारवाईत पोलिसांनी स्पा व्यवस्थापिका टी. झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय 32, मूळ रा. नागालँड, सध्या रा. कोंढवा) हिला अटक केली आहे. या रॅकेटमधील अन्य एका मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तर, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक मोहीम उघडली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्याच्या आलिशान स्पा सेंटरमध्ये गेला व्यक्ती; आत जाताच दिसलं 'ते' धक्कादायक दृश्य, धावतच आले पोलीस
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement