advertisement

Kitchen Hacks : संत्री खाल्ल्यानंतर साल फेकू नका; 'या' 7 स्मार्ट आणि सोप्या पद्धतीनं करा वापर, वाचतील पैसे..

Last Updated:
Orange Peel Easy And Smart Uses : संत्र्याची साल सहसा सगळे फेकूनच देतात. खूप कमी लोक त्याचा वापर करतात, तेही फक्त साल वाळवून त्याची पावडत बनवून. मात्र ही खूप वेळखाऊ पद्धत आहे. म्हणून बऱ्याच लोकांना त्याचा कंटाळाही येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही संत्र्याच्या सालीचा स्मार्ट वापर करू शकता.
1/7
बऱ्याचदा दारं खिडक्या बंद असल्या की, आर्द्रतेमुळे घरात विचित्र उग्र वास येतो. महागडे स्प्रे वापरण्यापेक्षा तुम्ही इथे संत्र्याच्या साली वापरू शकता. यासाठी ​​एका पातेल्यात पाणी घ्या, त्यात संत्र्याच्या साली टाका आणि मंद आचेवर उकळा. काही मिनिटांतच फ्रेश सुगंध संपूर्ण घरात पसरेल.

2/7
घरी पाहुणे येत असतील किंवा मुलांसाठी एखादे खास ड्रिंक किंवा मॉकटेल बनवायचे असेल तेव्हा  संत्र्याच्या साली तुमच्या ड्रिंकच्या सर्व्हिंगला आणखी सुंदर बनवू शकता. सालीच्या पातळ पट्ट्या बनवा आणि कापून काचेच्या ग्लासच्या कडा सजवा. यामुळे ड्रिंक खूप सुंदर दिसेल आणि मुलांना आवडेल. तसेच ड्रिंक करताना प्रत्येकवेळी संत्र्याचा फ्रेश सुगंध देखील मिळेल.

3/7
स्वयंपाकघरातील स्लॅब आणि टाइल्समधील घाण साफ करण्यासाठी महागड्या क्लीनरऐवजी संत्र्याच्या सायली वापरा. एका काचेच्या बाटलीत संत्र्याच्या साली भरा आणि त्यावर पांढरा व्हिनेगर घाला. ते दोन आठवडे बंद ठेवा. मिश्रण गाळून घ्या, त्यात अर्धे पाणी टाका आणि ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे नैसर्गिक क्लिनर हट्टी डाग काढेल आणि तुमच्या किचनला फ्रेश सुगंधही देईल.

4/7
संत्र्याच्या साली गार्डनिंगसाठी बेस्ट आहेत. रोपांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांची साल कोमट पाण्यात भिजवा आणि त्यात थोडे लिक्विड सोप घाला. काही दिवस तसेच ठेवा आणि नंतर गाळून पानांवर स्प्रे करा. याच्या तीव्र वासामुळे कीटक लगेच रोपांपासून दूर होतील.

5/7
कुकर किंवा पॅन खूप घाण किंवा तेलकट चिकट झाले असेल तर त्यासाठीही या साली उपयुक्त ठरू शकतात. संत्र्याच्या सालीच्या पांढऱ्या भागावर थोडी राख किंवा बेकिंग सोडा लावा आणि त्याने भांडी घसा. यामुळे चिकटपणा लवकर निघेल आणि अॅल्युमिनियम, स्टीलची भांडी नव्यासारखी चमकतील.

6/7
तुम्ही त्वचेसाठीही या सालींचा वापर करू शकता. यासाठी साली स्वच्छ धुवा, उन्हात वाळवा आणि त्याची बारीक पावडर करा. आंघोळ करताना बॉडी स्क्रब म्हणून ते वापरा. ​​हे मृत त्वचा काढून टाकते, त्वचा फ्रेश करते आणि सौम्य सुगंध देखील देते.

7/7
घरात मंद सुगंध हवा असेल तर तुम्ही संत्र्याच्या सालीचा दिवा बनवू शकता. यासाठी अर्धी कापलेली वाटीच्या आकाराची संत्र्याची साल घ्या. त्यात तेल घाला आणि वात टाकून ती पेटवा. हे सुंदर तर दिसतंच, त्यासोबत सुगंधही येतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement