Weather Alert: महाराष्ट्रात 48 तास धोक्याचे, मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप, 14 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती असून 14 जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्च महिन्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असून काही भागात उष्णतेची लाट आली आहे. हवामान विभागाने 10 मार्च रोजी राज्यातील 14 जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा अलर्ट दिला आहे. त्यामुळे बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहील. कोकण ते विदर्भ विभागानुसार आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
गेल्या काही दिवसांत उत्तर कोकणला हवामान विभागाचा यलो अलर्ट कायम आहे. या भागात उष्ण आणि दमट हवामान स्थिती असून नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीला उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असेल. काही ठिकाणी कमाल तापमान 38 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement





