Sanju Samson: संजू सॅमसन नावाचं वादळ, आज इतिहास घडवला, आता धोनीनंतर ठरला दुसरा भारतीय खेळाडू!
- Published by:Sachin S
Last Updated:
संजू सॅमसनने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून न्यूझीलंडच्या संघाला चांगलात घाम फोडला.
अहमदाबाद : भारतीय क्रिकेट टीमने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. पण, भारताच्या या विजयामध्ये संजू सॅमसनचा सिंहाचा वाटा आहे. कारण, मागील तिन्ही मॅचमध्ये ज्या झंझावाता सारखा संजू सॅमसन खेळला त्यामुळे भारतााच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा झाला. आजच्या अंतिम सामन्यातही संजू सॅमसनने न्यूझीलंडच्या बॉलरची धुलाई केली. पण, धडाकेबाज खेळी बरोबर संजूने आता थाला अर्थात महेंद्र सिंह धोनीचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
संजू सॅमसनने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून न्यूझीलंडच्या संघाला चांगलात घाम फोडला. पण आता त्याने माजी कर्णधाार आणि विकेटकिपर महेंद्र सिंह धोनीलाही मागे टाकलं आहे. केरळचा 31 वर्षीय संजू सॅमसनने मॅट हेनरीच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारताच टी20 इंटरनॅशनलमध्ये स्पेशलिस्ट विकेटकीपर-बॅट्समन म्हणून 1000 रन पूर्ण केले आहे.
advertisement
ऋषभ आणि ईशानलाही टाकलं मागे
एमएस धोनीने 1617 रन्स केले होते. त्यानंतर आता संजू हा दुसरा विकेटकिपर ठरला आहे. संजूने हे कारनामा आपल्या 45व्या कीपर म्हणून खेळणाऱ्या सामन्यात केलाा आाहे, तर त्याच्या नावावर आता 62 टी20 इंटरनॅशनल सामन्यात 1316 रन्स आहेत. या रेसमध्ये त्याने ऋषभ पंत (996) आणि ईशान किशन (545) यांना मागे टाकलं आहे.
advertisement
वर्ल्ड कपमध्ये संजूचे सर्वाधिक सिक्स
आजच्या अंतिम सामन्यात संजूने तडाखेबाज बॅटिंग केली. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने सिक्स मारला आणि तो या टूर्नामेंटमधलाा 17वाा सिक्स ठरला. संजूने यावेळी न्यूझीलंडच्या फिन एलनचा ऐतिहासिक रेकॉर्डही मोडला. फिन एलनने या वर्ल्ड कपच्या 8 सामन्यात 20 सिक्स मारले होते, तर संजूचे 21 सिक्स मारले आहेत. एखाद्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा जगातील नंबर-1 बॅट्समन ठरलाा आहे.
advertisement
जगात आता संजूचा दरार
दरम्यान, इंग्लंडच्या जोस बटलर 3592 रन, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि मोहम्मद रिजवान 3000+ रन्स यांचा असा रेकॉर्ड असला तरी संजूने ज्या वेगाने रन्स केले आहेत, त्याने जगाला आपली ताकद दाखवून दिली आाहे. आहे. फायनलमध्ये त्याची आक्रमकता साजेशीर होती. तो फक्त धोनीची परंपरा पुढे नेत नाही, तर स्वतःची अशी ओळख बनवत आहे, जी पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरणार आहे. अहमदाबादच्या मैदानात संजूने 89 रन्सची तडाखेबाज खेळी केली, इंग्लंडविरुद्धही संजूने 89 रन्सची खेळी केली होती. तो शतकासाठी खेळाला नाहीतर टीमसाठी खेळलाा, अशी सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 12:00 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson: संजू सॅमसन नावाचं वादळ, आज इतिहास घडवला, आता धोनीनंतर ठरला दुसरा भारतीय खेळाडू!









