भारताने फक्त T20 World Cup जिंकला नाही, टीम इंडिया झालीय 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स'! असा विक्रम करणारा जगातील पहिलाच संघ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IND vs NZ T20 World Cup Final 2026: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडचा पराभव करत आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026चे विजेतेपद मिळवले.
अहमदाबाद : ICC T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारताने इतिहास रचला आहे. या विजयासह टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप तीन वेळा जिंकणारा जगातील पहिला संघ ठरली आहे. इतकेच नव्हे तर भारताने आपले विजेतेपद कायम राखत सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला आहे.
या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश आता भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि रोहित शर्मा या टी-20 विजेत्या कर्णधारांच्या यादीत गेले आहे. या तिघांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत टी-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सलग दुसरा आणि एकूण तिसरा विश्वचषक
या विजयासह भारताने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. आजपर्यंत कोणत्याही संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग दोन वेळा विजेतेपद मिळवता आले नव्हते. मात्र भारताने हा पराक्रम करत इतिहास घडवला आहे.
advertisement
भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. सलग दोन वेळा विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया ही जगातील पहिलीच टीम ठरली आहे.
घरच्या मैदानावरही ऐतिहासिक विजय
याशिवाय आणखी एक मोठा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला स्वतःच्या देशात टी-20 वर्ल्ड कप जिंकता आले नव्हते. मात्र सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा पराक्रमही साध्य केला.
advertisement
या विजयासह भारत आता टी-20 वर्ल्ड कप सर्वाधिक वेळा जिंकणारा देश ठरला आहे. भारताने आतापर्यंत तीन वेळा हा किताब जिंकला आहे, तर वेस्ट इंडिजने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे.
इतक नाही तर भारतीय संघाची टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघाविरूद्धची कामगिरी अतिशय खराब होती. न्यूझीलंडविरुद्ध कधीच विजय मिळवता आला नव्हता. याआधी 2007, 2016 आणि 2021 मध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आज मात्र भारताने हा इतिहास बदलून टाकला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 11:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताने फक्त T20 World Cup जिंकला नाही, टीम इंडिया झालीय 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स'! असा विक्रम करणारा जगातील पहिलाच संघ









