advertisement

Rohit Sharma : जिथे हृदयावर घाव झाला, आज तिथेच आनंदाश्रू, फायनल जिंकल्यानंतर रोहितची पहिली रिएक्शन!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारून इतिहास घडवला आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
1/8
2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर आता 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडिया चॅम्पियन झाली आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे. सर्वाधिक 3 टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विश्वविक्रमही भारतीय टीमच्या नावावर झाला आहे.

2/8
स्वत:च्या देशामध्येच टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे. भारताने दिलेल्या 256 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 159 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाचा 96 रननी विजय झाला.

3/8
टीम इंडियाच्या या विजयाचा क्षण पाहण्यासाठी रोहित शर्मा हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माची रिएक्शन सगळं काही सांगून गेली. रोहित शर्मा हा या टी-20 वर्ल्ड कपचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे.

4/8
अभिषेक शर्माने जेकब डफीची शेवटची विकेट घेऊन टीम इंडियाला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवलं, या विजयानंतर स्टेडियममध्ये बसलेला रोहित शर्मा उभा राहिला आणि त्याने टाळ्या वाजवायला सुरूवात केली. रोहितसोबत एमएस धोनी आणि आयसीसी अध्यक्ष जय शाहदेखील होते.

5/8
2025 मध्ये भारतीय महिला टीमने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात वनडे वर्ल्ड कप जिंकला होता, त्या फायनलमध्येही रोहित शर्माने डी.वाय.पाटील स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये बसून सामना पाहिला. हरमनप्रीतने शेवटचा कॅच पकडल्यानंतर रोहित शर्माने आकाशात पाहिलं, रोहितची ही रिएक्शनही व्हायरल झाली होती.

6/8
अहमदाबादच्या याच मैदानामध्ये 3 वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्मासह कोट्यवधी क्रिकेट चाहते ढसाढसा रडले होते. पण याच मैदानात टीम इंडियाने रोहित आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या दु:खाचा हिशोब चुकता केला.

7/8
2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा धक्का लागला होता. या पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाचे सगळे खेळाडू मैदानावरच ढसाढसा रडले होते, पण त्यानंतर भारतीय टीमने मागे वळून पाहिलं नाही.

8/8
वनडे वर्ल्ड कपच्या पराभवानंतर भारतीय टीमने 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला यानंतर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही रोहितच्याच नेतृत्वात टीम इंडियाचा विजय झाला.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement