advertisement

Ulhasnagar News: पाणी पुरवठ्याची अपडेट व्हॉट्स ॲपवर एका क्लिकवर मिळणार, जाणून घ्या सविस्तर

Last Updated:
Ulhasnagar Water Supply Update: उल्हासनगर महापालिकेने पाणीपुरवठ्याची अचूक माहिती नगरसेवक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष व्हॉट्स ॲप सेवा सुरू केली आहे. यामुळे पाणी कधी येणार किंवा दुरुस्तीमुळे पुरवठा बंद राहणार का याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
1/6
Water Cut
उल्हासनगर महानगर पालिका आता आणखीनच डिजीटल होणार आहे. उल्हासनगरमधील नागरिकांना आता व्हॉट्स ॲपवरून पाणी पुरवठ्याबाबत अपडेट मिळणार आहे. महानगर पालिकेने हा नागरिकांसाठी घेतलेला एक दिलासादायक निर्णय म्हणता येईल.
advertisement
2/6
Water Cut
उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी कमी व्हाव्या आणि नागरिकांना माहिती वेळेत मिळावी यासाठी महापालिकेने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिका डिजीटल कार्यपद्धतीकडे वळताना दिसत आहे.
advertisement
3/6
 उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून पाणीपुरवठा विभागाची माहिती नगरसेवकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी विशेष व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्स ॲपवरील मिळणाऱ्या नव्या सेवेमुळे आता पाणीपुरवठा कधी होणार, दुरुस्तीमुळे पाणी बंद राहणार का? वेळापत्रकात कोणते बदल होणार? याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

4/6
 नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचावी यासाठी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ही व्हॉट्सॲप सेवा विकसित केली आहे. यासाठी महापालिकेने 8454079793 हा अधिकृत मोबाईल क्रमांक निश्चित केला आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरून पाणी पुरवठ्याबाबतचे अधिकृत संदेश, वेळापत्रक आणि तातडीच्या सूचना पाठवण्यात येणार आहेत.

5/6
 या नंबरवरून उल्हासनगरातील नागरिकांना प्रत्येक परिसरातील पाण्याचे नियोजन, बदलांची माहिती आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पीडीएफ स्वरूपातील अधिकृत आदेश आणि परिपत्रकेही मोबाईलवर मिळणार आहेत. या नव्या नियोजनामुळे नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

6/6
 महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवणे आणि नागरिकांना वेळेत अचूक माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे नगर सेवकांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची माहिती आधीच देता येईल आणि नागरिकांना त्यानुसार नियोजन करणे सोपे होईल.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement