IND vs NZ Final : न्यूझीलंडचा प्लेअर भारतीय खेळाडूवर धावून आला, मॅचमध्ये राडा, VIDEO समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
अर्शदीपने बॉल पकडला आणि थेट डेरी मिचेलला आऊट करण्यासाठी फेकला. पण हा बॉल थेट मिचेलच्या मांडीवर लागला.
अहमदाबाद : भारतीय क्रिकेट टीमने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. न्यूझीलँडच्या संघाला पराभूत करून भारतीय संघाने पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. भारताने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपच्या चषकावर नाव कोरलं आहे. भारतीय फलंदाजांनी एकीकडे धावांचा डोंगर उभा केला तर दुसरीकडे भारतीय बॉलर्सने भेदक मारा करून किवीच्या संघाला पळताभुई करून सोडलं. पण, या थरारक सामन्यात अर्शदीप आणि डेरी मिचेल या दोन्ही प्लेअरमध्ये चांगलाच राडा झाला.
भारताने पहिली बॅटिंग करत 255 धावांचा डोंगर उभा केला. आता २५५ धावांचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडची टीम मैदानात उतरली खरी पण पण भारतीय बॉलरच्या भेदक माऱ्यापुढे टिकली नाही. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि फिन अॅलेन यांनी झुंज दिली खरी पण फायदा झाला नाही. त्यातच अर्शदीप सिंग आणि डेरी मिचेलमध्ये मैदानात राडा झाला.
advertisement
Arshdeep Singh apologising to Darly Mitchell 👌 pic.twitter.com/xa4ArtyGlE
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2026
न्यूझीलंडचे पाच विकेट पडल्यानंतर डेरी मिचेल अजूनही मैदानात होता. कारण हा खेळाडू अनेकदा टीम इंडियाच्या विजयाच्या आड आला आहे. ११ ओव्हर अर्शदीप टाकत होता. चौथा बॉल टाकला, पण डेरी मिचेलने समोर टोलावला. अर्शदीपने बॉल पकडला आणि थेट डेरी मिचेलला आऊट करण्यासाठी फेकला. पण हा बॉल थेट मिचेलच्या मांडीवर लागला.
advertisement
त्यामुळे मिचेल चांगलाच भडकलाा. तो अर्शदीपच्या अंगावर धावून गेला पण अम्पायरने मिचेलला थांबवलं, त्याची समजूत काढली. तिकडे सुर्याकुमरही पळत आला. त्याने मिचेलची समजूत काढली. अम्पायरने अर्शदीपलाही समजावून सांगितलं. काही मिनिटांचा हा वाद खेळाडू वृत्तीने लगेच सुटला. पण, हा सगळा प्रकार आता व्हायरल झाला आहे. पुढे अक्षर पटेल याने मिचेलला आऊट केलं आणि भारतावरच प्रेशर लगेच कमी झालं.
advertisement
भारताकडून बुमराहने भेदक मारा करत ३ विकेट मिळवल्या आणि विजयाचा मार्ग मोकळाा करून दिला. संपूर्ण न्यूझीलंड टीम 159 धावांवर ऑल आऊट झाली. भारताने हा सामना 96 रन्सने जिंकला,
Location :
Gujarat
First Published :
Mar 08, 2026 11:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : न्यूझीलंडचा प्लेअर भारतीय खेळाडूवर धावून आला, मॅचमध्ये राडा, VIDEO समोर







