advertisement

Thane Water Cut : उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीबाणी, ठाण्यात पुरवठा बंद, कधी अन् कुठे? वाचा

Last Updated:

Thane Water Cut News : ठाणे शहरांतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरात येत्या काही दिवसांत पाणी कपातीची समस्या जाणवणार आहे.

24 hour water supply shutdown in Thane areas
24 hour water supply shutdown in Thane areas
ठाणे : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या दिवशी आणि किती दिवस ठाणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
पाणी जपून वापरा
मिळालेल्या माहितीनुसार, उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या सिद्धेश्वर जलकुंभ परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करण्यात येत असताना जुन्या आउटलेट जलवाहिनीला अडथळा येत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 24 तास ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
'या' भागांना बसणार फटका
या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी परिसर, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड आणि गोकुळनगर या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Water Cut : उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीबाणी, ठाण्यात पुरवठा बंद, कधी अन् कुठे? वाचा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement