advertisement

संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले; रात्री घरी परतताच दिसलं असं काही, पुरतं हादरलं पुण्यातील कुटुंब

Last Updated:

रात्री अकराच्या सुमारास जेव्हा तक्रारदार घरी परतले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. घराचा दरवाजा उघडा आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसले

पुण्यात घरफोडी (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात घरफोडी (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातून घरफोडीच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे, नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नुकतंच शहरातील गजबजलेल्या कसबा पेठेत घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचं कुलूप तोडून तब्बल सहा लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
फरासखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आपल्या कुटुंबीयांसह कसबा पेठेतील पवळे चौक परिसरातील एका सोसायटीत राहतात. ६ मार्च रोजी सायंकाळी हे कुटुंब कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून चोरटे फरार झाले. रात्री अकराच्या सुमारास जेव्हा तक्रारदार घरी परतले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. घराचा दरवाजा उघडा आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसरातील पाहणी केली. चोरट्यांनी रेकी करून ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. भरवस्तीत आणि सोसायट्यांच्या सुरक्षिततेला छेद देत झालेल्या या चोरीमुळे पुणेकर आता धास्तावले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, अशी माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले; रात्री घरी परतताच दिसलं असं काही, पुरतं हादरलं पुण्यातील कुटुंब
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement