नाशिकला नेलं, एकच रूम बूक केली अन्.., राजकीय नेत्याकडून कॉलेज तरुणीचं लैंगिक शोषण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय वर्तुळाला हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका २१ वर्षीय तरुणीचं ७८ वर्षीय राजकीय नेत्याने लैंगिक शोषण केलं आहे.
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय वर्तुळाला हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका २१ वर्षीय तरुणीचं ७८ वर्षीय राजकीय नेत्याने लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी मागील पाच वर्षांपासून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तिला शिक्षणात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीनं तिच्याशी जवळीक साधली होती. यानंतर तिच्या घरच्यांकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवून आरोपी सातत्याने तिला त्रास देत होता. मागील पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्यावेळी पीडित तरुणी अवघ्या १७ वर्षांची होती. आता अखेर आरोपीचा त्रास वाढत गेल्यानंतर तिने पुलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. दिवाकर गिमे असं ७८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. त्याची वर्धा शहरासह आसपासच्या भागात राजकीय ताकद आहे. याच राजकीय ताकदीचा फायदा घेऊन आरोपी पीडित तरुणीवर शरीर संबंधासाठी दबाव टाकत होता, असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, २०२० मध्ये तरुणीने दहावी उत्तीर्ण केली होती. तिला अकरावीला सायन्सला अॅडमिशन घ्यायचं होतं. तेव्हा पहिल्यांदा तिची ओळख आरोपी गिमे याच्यासोबत झाली होती. त्याने अॅडमिशनसाठी मदत केली होती. यानंतर आरोपीनं तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. यानंतर त्याने मेसेज आणि कॉलद्वारे तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. जून २०२१ मध्ये त्याने पीडितेला NEET परीक्षेचे क्लास लावण्याच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेला.
advertisement
नाशिकला नेऊन अत्याचाराचा प्रयत्न
नाशिकला गेल्यानंतर त्याने येथील एका शासकीय निवासस्थानात दोघांना राहण्यासाठी एकच रूम बूक केली होती.दोघंही एकाच बेडवर अॅडजस्ट करू असं म्हणत आरोपीनं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने याला विरोध केला. आपल्याला स्वतंत्र बेड हवा असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपीनंही वेगळा बेड अॅडजस्ट करून दिला. पण त्यानंतर आपल्यासोबत काही चुकीचं घडू नये, म्हणून आपण रात्रभर नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलवर बोलत होते, असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरोपीला काहीच करता न आल्याने तो दुसऱ्याच दिवशी तरुणीला घेऊन पुन्हा वर्ध्याला आला. याबाबत पीडितेनं घरच्यांना सांगितलं. मात्र घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
advertisement
"तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र शरीरसंबंध ठेवायला मज्जा येईल"
यानंतरही त्याने तरुणीला त्रास देणं सुरुच ठेवलं. आरोपी वारंवार तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र शरीरसंबंध ठेवायला मज्जा येईल, असं म्हणत होता, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच तो अश्लील वेबसाईटच्या लिंक पाठवून आपणही अशाच प्रकारे संबंध ठेवू, असं आरोपी पीडितेला म्हणायचा, असंही तक्रारीत नमूद केलं आहे.
advertisement
गुन्हा दाखल होताच आरोपीला बेड्या
मागील पाच वर्षांपासून हा त्रास सुरू होता. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने पीडितेनं अखेर पुलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एका राजकीय नेत्यानेच आपल्या नातीच्या वयाच्या तरुणीचं अशाप्रकारे लैंगिक शोषण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकला नेलं, एकच रूम बूक केली अन्.., राजकीय नेत्याकडून कॉलेज तरुणीचं लैंगिक शोषण






