advertisement

हार्दिक आणि इरफानचा वाद मिटला! कट्टर दुश्मनांची एकमेकांना 'जादू की झप्पी', वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा Video आला समोर

Last Updated:

Irfan Pathan hug Hardik Pandya Video : हार्दिक आणि इरफान यांच्यातील वादाचं प्रमुख कारण म्हणजे बडोदा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण... बडोदा क्रिकेटवर कुणाचं वर्चस्व? असा सवाल गेल्या अनेक वर्षापासून विचारला जातो.

Irfan Pathan hug Hardik Pandya After India Winning T20 world Cup
Irfan Pathan hug Hardik Pandya After India Winning T20 world Cup
Irfan Pathan vs Hardik Pandya : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक वाद समोर येत असतात. गंभीर आणि धोनीचा वाद सर्वांना माहिती आहे. तर विराट कोहली अन् गंभीर यांचा वाद नवा नाही. तसेच क्रिकेटमध्ये असे अनेक वाद असतात जे कधीही समोर येत नाही. असाच एक वाद म्हणजे हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यातील वाद... मात्र हा वाद मिटला की काय? असा सवाल क्रिडा वर्तुळात विचारला जातोय. त्याचा एक भारी व्हिडीओ (Irfan Pathan hug Hardik Pandya) देखील समोर आला आहे.

डोदा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण

हार्दिक आणि इरफान यांच्यातील वादाचं प्रमुख कारण म्हणजे बडोदा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत राजकारण... बडोदा क्रिकेटवर कुणाचं वर्चस्व? असा सवाल गेल्या अनेक वर्षापासून विचारला जातो. इरफान पठाण टोळीने अनेकवेळा बडोदा क्रिकेटवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर आता पांड्याने देखील आपली फिल्डिंग टाईट केली आहे. कुणाच्या मदतीने हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये स्नेहभाव पहायला मिळाला.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Ashish Nair (@_sheeeeeeeshh)



advertisement

एकमेकांची गळाभेट घेतली

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका नाचत मैदानातून जात होते. त्यावेळी इरफान पठाण समालोचन करत होता. अशातच हार्दिक आणि इरफान यांनी एकमेकांना पाहिलं. दोन्ही खेळाडूंनी यावेळी पुढाकार घेतला अन् एकमेकांची गळाभेट घेतली. इरफानने यावेळी महिकाची देखील भेट घेतली. दोघांमध्ये काहीतरी संवाद देखील झाला. यावेळी इरफानच्या तोंडावरचा रंग उडाल्याचं दिसलं तर हार्दिक देखील हलक्या स्माईलमध्ये बघत होता.
advertisement

हार्दिक इरफान यांच्यातील वाद काय?

दरम्यान, मागील आयपीएलमध्ये देखील हार्दिक आणि इरफान पठाण यांच्यात वाद निर्माण झाला होता. हार्दिक पांड्यावर टीका केल्याने इरफाण पठाण याला कॉमेन्ट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर इरफाणने आपल्या युट्यूब चॅनेलमधून पांड्यावर नाव न घेता जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच पेटला होता. अशातच आता दोघांमधील वाद मिटला की काय? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक आणि इरफानचा वाद मिटला! कट्टर दुश्मनांची एकमेकांना 'जादू की झप्पी', वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा Video आला समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement