advertisement

Mumbai News: आखातात पेटलेल्या युद्धाचे मुंबईकरांना चटके! २० टक्के हॉटेल्स बंद, ३ दिवसांत ओढवणार मोठं संकट

Last Updated:

Mumbai News: खातामध्ये सुरू असलेल्या या युद्धाचे चटके थेट मुंबईकरांना बसू लागले आहेत. आता, या आंतरराष्ट्रीय युद्धाचा थेट फटका आता तुमच्या जिभेला आणि खिशाला बसणार आहे.

News18
News18
मुंबई: इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात पुकारलेले युद्ध आठवडाभरानंतर आणखीच तीव्र झाले आहे. इराणकडून अमेरिका-इस्रायलला प्रत्युत्तर दिले जात आहे. आखातामध्ये सुरू असलेल्या या युद्धाचे चटके थेट मुंबईकरांना बसू लागले आहेत. आता, या आंतरराष्ट्रीय युद्धाचा थेट फटका आता तुमच्या जिभेला आणि खिशाला बसणार आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट मुंबईच्या किचनपर्यंत पोहोचले आहेत.

मुंबईतील २० टक्के हॉटेल्सचं शटर डाऊन...

मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल्सना गॅसअभावी टाळे ठोकण्यात आले आहे. 'आहार' (Association of Hotels and Restaurants Mumbai) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ही तर केवळ सुरुवात आहे.

पुढील ३ दिवस अत्यंत कठीण, ५० टक्के हॉटेल्स बंद होणार?

advertisement
गॅसचा हा तुटवडा असाच कायम राहिला, तर परिस्थिती भीषण होऊ शकते. येत्या तीन दिवसांत मुंबईतील तब्बल ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची भीती आहार संघटनेने व्यक्त केली आहे. एलपीजी आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा न झाल्यामुळे हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

सरकार दरबारी धाव

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉटेल संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रतिनिधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. तर, आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेणार आहेत. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे केली जाणार आहे.
advertisement

मुंबईच नाही, तर बंगळुरूमध्येही शुकशुकाट!

गॅस टंचाईचा हा विळखा केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. बंगळुरूमध्येही अनेक हॉटेल्सनी मंगळवारपासून आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जर युद्ध थांबले नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही, तर संपूर्ण देशातील हॉटेल उद्योग कोलमडून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News: आखातात पेटलेल्या युद्धाचे मुंबईकरांना चटके! २० टक्के हॉटेल्स बंद, ३ दिवसांत ओढवणार मोठं संकट
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement