advertisement

Usha Nadkarni : नवऱ्यापासून वेगळं आयुष्य, पण आडनाव मात्र तेच; पहिल्यांदाच बोलल्या उषा नाडकर्णी

Last Updated:
Usha Nadkarni Surname : अभिनेत्री उषा नाडकर्णी लग्नानंतर काही वर्षात नवऱ्यापासून वेगळ्या झाल्या. मात्र त्या आजही नवऱ्याचं आडनाव वापरतात. याविषयी त्या काय म्हणाल्या पाहूयात.
1/7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या नेहमीच त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे तसंच स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक वागण्यामुळे ओळखल्या गेल्या. उषा नाडकर्णी यांनी आजवर कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केलं नाही. उषा नाडकर्णी यांना एक मुलगा आहे. पण त्या मुलापासून वेगळ्या एकट्या आयुष्य जगत आहेत.

2/7
उषा नाडकर्णी या लग्नानंतर काही वर्षात नवऱ्यापासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर त्यांनी मुलाचा एकट्यानं सांभाळ केला. उषा या नवऱ्यापासून वेगळ्या झाल्यानंतरही त्यांनी त्यांचं आडनाव बदललं नाही. त्या आजही नाडकर्णी हे सासरचं आडनाव वापरतात. 

3/7
आडनाव लावण्याविषयी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या,
आडनाव लावण्याविषयी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, "नाडकर्णी लाव किंवा नको लावू, मला उषा म्हणून ओळखतात. लग्नाआधी उषा कलबाग होती. लग्नानंतर उषा नाडकर्णी झाले. नवरा नाही तरी नाडकर्णी ठेवलंय मी. नावात काय आहे. बाई तिचं आहे."
advertisement
4/7
नवऱ्यावरून त्यांना ट्रोल केलं त्याविषयी बोलताना त्या म्हणाला,
नवऱ्यावरून त्यांना ट्रोल केलं त्याविषयी बोलताना त्या म्हणाला, "कोणाला ट्रोल करणं, बोलणं, कशाला बोलता तुम्ही. मी नवरा नाही दाखवला याबद्दल वाचलं. नवरा कुठे आहे? तुम्हाला त्याला घेऊन प्यायला बसायचं आहे का त्याच्याबरोबर. काय करायचं आहे तुम्हाला."
advertisement
5/7
उषा नाडकर्णी यांनी काही वर्षांआधी मुंबईत स्वत:चं घर घेतलं. पण त्या घरात त्या एकट्या राहतात. त्यांचा मुलगा त्यांच्या भावाच्या घरी राहतो. मुलाचं लग्न झालं असून त्याला मुलगी देखील आहे. नातीबरोबर त्यांचं खूप गोड कनेक्शन असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

6/7
एकट्या राहत असताना उषा ताईंना भीती देखील वाटते. मी घरात एकटी असते कधी पडले तर मला वाचावायला कोण येईल का? असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. वयाच्या 80 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह कायम आहे. मला मरेपर्यंत काम करायचं आहे. काम करताना मरण आलं तर मला आवडेल असंही त्यांनी सांगितलं. 

7/7
उषा नाडकर्णी या वयाच्या 80 व्या वर्षी देखील अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांनी मराठी बिग बॉस सारखा शो केला. सत्तर दिवस त्या घरात होत्या. त्यानंतर हिंदी टेलिव्हिजनवर सेलिब्रेटी मास्टर शेफ सारखा शो देखील त्यांनी केला. येत्या काळात त्यांचा तुंबाडची मंजुळा, लाडकी बहिण हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement