advertisement

Hardik Pandya : 'मी अगस्त्यासाठी खेळलो...', लेकाकडं पाहून हार्दिक पांड्या भावुक, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील Video

Last Updated:

Hardik Pandya Team india Dressing room Video : माझा मुलगा अगस्त्य आणि माहिका स्टँडवर माझ्याकडे पाहत होते. त्यामुळे माझ्याकडून त्यांना अपेक्षा होत्या. त्यामुळे मला कामगिरी करणं गरजेचं होतं, असं पांड्या म्हणाला.

Hardik Pandya Emotinal For Son Agastya
Hardik Pandya Emotinal For Son Agastya
Hardik Pandya Emotinal For Son Agastya : स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाने फायनलमध्ये जागा फिक्स केली आहे. सेमीफायनलमध्ये हार्दिकने प्रथम बॅटिंग करताना केवळ 12 बॉल्समध्ये 27 रन्सची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 3 फोर आणि 2 सिक्स मारत 225 च्या स्ट्राईक रेटने रन्स वसूल केले. त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताला इंग्लंडसमोर 253 रन्सचे विशाल लक्ष्य ठेवता आले. हार्दिकने मोक्याच्या क्षणी गियर बदलल्याने टीमला मोठा स्कोर उभा करता आला. पण पांड्याची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे 20 व्या ओव्हरमध्ये केलेला थ्रो... पांड्याच्या थ्रोमुळे टीम इंडियाला बेथलची विकेट घेता आली.

ड्रेसिंग रुममधला पांड्याचा व्हिडीओ

आयुष्यात दोन गोष्टी असतात, तुमची भीती वाढत असते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असते. मी दुसरा पर्याय निवडला, असं हार्दिक पांड्या म्हणाला. तसेच ड्रेसिंग रुममधला पांड्याचा व्हिडीओ समोर आलाय. त्यात पांड्याने खेळाडूंना उत्साही राहण्याचं आवाहन केलं. आयुष्यात अशा फिलिंग खुप कमीवेळा येतात. त्यामुळे अशा गोष्टी इन्जॉय करा, असं हार्दिक पांड्या सेमीफायनलनंतर म्हणाला.
advertisement

मला स्टंपवरच थ्रो करायचा होता पण...

मला फक्त एका बॅटरची विकेट पाहिजे होती, ते म्हणजे इंग्लंडचा बेथल याची... बेथलने चांगली बॅटिंग केली होती. बेथलला रनआऊट करताना मला स्टंपवरच थ्रो करायचा होता. पण थ्रो थोडा बाजूला गेला पण आमचं काम झालं. मी जास्त अॅक्शनमध्ये होतो कारण माझा मुलगा आणि महिका तिथंच होती, असं पांड्या म्हणाला.
advertisement

मुलगा अगस्त्य आणि माहिका स्टँडवर...

दरम्यान, माझा मुलगा अगस्त्य आणि माहिका स्टँडवर माझ्याकडे पाहत होते. त्यामुळे माझ्याकडून त्यांना अपेक्षा होत्या. त्यामुळे मला कामगिरी करणं गरजेचं होतं. मला त्यांना दाखवायचं होतं की, मी किती उत्साही आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला. हार्दिक पंड्याचा सध्याचा फॉर्म पाहता न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः मधल्या ओव्हर्समध्ये विकेट काढण्याची त्याची क्षमता कॅप्टन सूर्यकुमार यादवसाठी फायदेशीर ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : 'मी अगस्त्यासाठी खेळलो...', लेकाकडं पाहून हार्दिक पांड्या भावुक, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील Video
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement