advertisement

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतावर मंदीचं संकट? पेट्रोल-डिझेलसह या गोष्टी महागणार

Last Updated:

इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे क्रूड ऑइल, LPG, PNG च्या किंमती वाढल्या आहेत. तेल १०० डॉलर प्रति बॅरल झाल्यास महागाई वाढेल. EMI स्वस्त होण्याची शक्यता नाही.

News18
News18
इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा भडका आता जमिनीपुरता मर्यादीत राहिला नाही, समुद्रातही हे युद्ध सुरू झालं आहे. या युद्धाची धग आता जगभरातील देशांना जाणवू लागली आहे. त्याच्या तीव्र झळा तुमच्या आमच्या किचनपर्यंत पोहोचत आहेत. क्रूड ऑइलचा तुटवडा, मर्यादीत साठा, LPG आणि PNG चा मर्यादीत साठा यामुळे किंमती गगनाला भि़डल्या आहेत.जागतिक रेटिंग एजन्सी 'मूडीज'ने एक असा रिपोर्ट दिलाय, जो वाचल्यानंतर धाबे दणाणतील. हे युद्ध फक्त बॉम्ब आणि मिसाईल्सपुरतं मर्यादित नाही, तर ते तुमच्या खिशावर झालेला सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक ठरू शकतं.
१०० डॉलरचा आकडा आणि तुमच्या खिशाला पडणारं भोकं
मूडीजच्या अहवालानुसार, जर कच्च्या तेलाने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आणि तो तिथेच टिकून राहिला, तर जगात महागाईचा असा भडका उडेल जो आटोक्यात आणणं अशक्य होईल. तेल महागलं की फक्त पेट्रोल-डिझेल महाग होतं असं नाही; तर ट्रकमध्ये येणारा भाजीपाला, दुकानातलं किराणा सामान आणि साधी सुईसुद्धा महाग होते. थोडक्यात, तुमची 'खरेदी करण्याची ताकद' हे युद्ध गिळून टाकेल.
advertisement
EMI स्वस्त होण्याची स्वप्नं विसरा!
तुम्ही जर गृहकर्ज किंवा कार लोनचा हप्ता कमी होण्याची वाट पाहत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. मूडीज म्हणतंय की, जोपर्यंत तेलामुळे महागाई वाढलेली असेल, तोपर्यंत बँका व्याजाचे दर कमी करणार नाहीत. उलट, तुमची आर्थिक ओढाताण वाढवण्यासाठी हे दर अजून प्रदीर्घ काळ 'चढेच' ठेवले जातील. म्हणजे एकीकडे महागाई वाढलेली आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर, अशी दुहेरी कात्री सामान्यांसाठी तयार केली जात आहे.
advertisement
आशिया आणि युरोपला सर्वात मोठा फटका!
या युद्धाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसेल? तर आपल्यासारख्या देशांना, जे तेलासाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. आशियाई देशांची अर्थव्यवस्था तेलावर चालते. जर आखाती देशांतून होणारा पुरवठा विस्कळीत झाला, तर जगात ऊर्जेचा हाहाकार माजेल. रस्ते ओस पडतील आणि कारखाने बंद पडण्याची भीती निर्माण होईल.
आर्थिक मंदीची नांदी!
मूडीजच्या या इशाऱ्याचा सरळ अर्थ हाच आहे की, हे युद्ध जितकं लांबेल तितकं जग मंदीच्या गर्तेत जाईल. केवळ ऊर्जा सुरक्षाच नाही, तर जागतिक विकास दरालाही (GDP) मोठी खीळ बसेल. त्यामुळे तेहरानमध्ये पडणारा प्रत्येक बॉम्ब हा तुमच्या-माझ्या बँक बॅलेन्सवर पडणारा घाव आहे, असं समजायला हरकत नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिका-इराण युद्धामुळे भारतावर मंदीचं संकट? पेट्रोल-डिझेलसह या गोष्टी महागणार
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement