advertisement

UPSC Success Story: आई धुणीभांडी करते, वडील वॉचमन, घरात गरिबी; पण पुण्याच्या लेकानं थेट 'IPS' बनून दाखवलं, थक्क करणारा प्रवास

Last Updated:

घरच्या गरिबीमुळे शिक्षण सुरू असताना त्यांना डबे पोहोचवण्याचे काम करावे लागले. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना L&T सारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली, पण त्यांचे ध्येय काहीतरी वेगळेच होते.

बापूसाहेब गायकवाड यांचा जीवनप्रवास
बापूसाहेब गायकवाड यांचा जीवनप्रवास
(गणेश दुडम, प्रतिनिधी) मावळ: जिद्द आणि चिकाटी असेल, तर परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी यशाची शिखरं कशी गाठता येतातच. याचं जिवंत उदाहरण म्हणजे बापूसाहेब गायकवाड यांचा जीवनप्रवास. गरिबीच्या सावटाखाली वाढलेल्या आणि आई-वडिलांच्या घामातून आकाराला आलेल्या या तरुणाने थेट आयपीएस (IPS) अधिकारी बनून आपल्या कुटुंबाचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.
स्वप्न उराशी अन् संघर्षाची वाट
अहिल्यानगरच्या एका छोट्या गावातून आलेल्या बापूसाहेब यांच्या प्रवासाची सुरुवात अत्यंत खडतर होती. घरच्या गरिबीमुळे शिक्षण सुरू असताना त्यांना डबे पोहोचवण्याचे काम करावे लागले. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना L&T सारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली, पण त्यांचे ध्येय काहीतरी वेगळेच होते. देशसेवेच्या स्वप्नासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. इतकेच नाही, तर CRPF मध्ये 'असिस्टंट कमांडंट'सारखी मानाची नोकरी मिळूनही त्यांनी ती नाकारली, कारण त्यांना त्याहूनही मोठे ध्येय गाठायचे होते.
advertisement
आई-वडिलांच्या कष्टाचे फळ
जेव्हा आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करायची आणि वडील बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून रात्रंदिवस राबायचे, तेव्हा बापूसाहेबांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे UPSC. या प्रवासात अपयश, निराशा आणि अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर अथक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर बापूसाहेब गायकवाड यांनी UPSC परीक्षेत देशात ५६१ वा क्रमांक मिळवून IPS होण्याचा मान पटकावला.
advertisement
जेव्हा यश मिळाले, तेव्हा देहूरोड येथील निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्यात नातेवाईक आणि आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ज्या आईने इतरांच्या घरात भांडी घासून मुलाला घडवले, तिचे कष्ट आज सार्थकी लागले होते. बापूसाहेब गायकवाड यांचा हा प्रवास हजारो तरुणांसाठी एक दीपस्तंभ आहे. गरिबी कधीच अडथळा नसते, फक्त स्वप्न पाहण्याची उमेद आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हवी, हेच त्यांनी आज जगाला दाखवून दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
UPSC Success Story: आई धुणीभांडी करते, वडील वॉचमन, घरात गरिबी; पण पुण्याच्या लेकानं थेट 'IPS' बनून दाखवलं, थक्क करणारा प्रवास
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement