IND vs NZ Final : स्टेडियम 'अनलकी' पण टीम इंडियासाठी अहमदाबादमधून आली गुड न्यूज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand Final Pitch Report : फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जातोय. त्यामुळे सूर्यासह भारतीय फॅन्सची धाकधूक वाढलीये. अशातच आता अहमदाबादमधून गुड न्यूज समोर आलीये.
India Vs New Zealand T20 World Cup Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलसाठी (IND vs NZ T20 World Cup Final) सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ तगडे असले तरी देखील टीम इंडियासाठी एक गोष्ट चिंतेची असेल ती म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम...अहमदाबादचं स्टेडियम (Ahamdabad Narendra modi stadium) टीम इंडियासाठी नेहमी अनलकी राहिलं आहे. टीम इंडियाने खूप कमी सामने या स्टेडियमवर जिंकले आहेत. त्यात आता फायनल सामना याच स्टेडियमवर खेळवला जातोय. त्यामुळे सूर्यासह भारतीय फॅन्सची धाकधूक वाढलीये. अशातच आता अहमदाबादमधून गुड न्यूज समोर आलीये.
लाल मातीचे प्रमाण अधिक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी मिक्स मातीचे पीच वापरले जाणार आहे. यात लाल मातीचे प्रमाण अधिक आणि काळ्या मातीचे प्रमाण थोडं कमी आहे. अशा परिस्थितीत हे पीच नक्की कसे वागेल? असा प्रश्न विचारला जातोय. लाल माती नैसर्गिकरित्या सच्छिद्र असते, त्यामुळे बॉलला चांगली उसळी (Bounce) मिळते. जसप्रीत बुमराह आणि लॉकी फर्ग्युसन सारख्या वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून बॉल वेगाने टप्पा पडून विकेटकीपरपर्यंत पोहोचवता येईल.
advertisement
अर्शदीप आणि पांड्यासाठी हवेत स्विंग
हवेत आर्द्रता असली तर, लाल मातीच्या खडबडीतपणामुळे बॉल सुरुवातीच्या 4 ओव्हर्समध्ये अर्शदीप सिंग आणि पांड्यासाठी हवेत स्विंग होऊ शकतो. लाल माती लवकर कोरडी होते, ज्यामुळे खेळपट्टीवर थोडे तडे जाऊ शकतात. यामुळे फिरकीपटूंना बॉल वळवण्यासाठी आणि खेळपट्टीवर ग्रीप मिळवण्यासाठी मदत होईल. काळी माती एक 'बाइंडिंग एजंट' म्हणून काम करते, ज्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे फुटत नाही. याचा अर्थ असा की, चेंडू बॅटवर व्यवस्थित येईल, पण मिचेल सँटनर किंवा कुलदीप यादव यांना फिरकीचा चांगला फायदा मिळेल, अशी शक्यता आहे.
advertisement
दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगचा तोटा
काळ्या मातीची खेळपट्टी हळूहळू 'स्लो' होते, पण या मिश्र खेळपट्टीवर उसळी टिकून राहील. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, टिम सीफर्ट, फिन एलन आणि ग्लेन फिलिप्स सारख्या फलंदाजांना, जे बॉलरच्या स्पीडचा वापर करून शॉट्स मारतात, त्यांच्यासाठी ही खेळपट्टी अनुकूल असेल. पण दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला याचा तोटा होईल.
advertisement
190 चं टार्गेट अवघड
दरम्यान, जास्त प्रमाणात लाल माती असल्याने, जसजसा सामना पुढे जाईल, खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणं थोडं कठीण होऊ शकते. अहमदाबादच्या मोठ्या बाउंड्रीज पाहता, 190 ही धावसंख्या अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे टीम इंडिया स्पिनर्सवर विश्वास दाखवू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 10:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : स्टेडियम 'अनलकी' पण टीम इंडियासाठी अहमदाबादमधून आली गुड न्यूज!








