advertisement

Pune Metro: पुणे मेट्रोचा शहराबाहेरही 'विराट' विस्तार! वाघोली आणि लोणी काळभोरपर्यंत जाळं; तुमच्या भागातून जाणार का?

Last Updated:

पुणे महानगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या विस्तार आराखड्याला मंजुरी दिली आहे.

शहराबाहेरही मेट्रो सुसाट(फाईल फोटो)
शहराबाहेरही मेट्रो सुसाट(फाईल फोटो)
पुणे : पुणे महानगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्पात पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या विस्तार आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता मेट्रो केवळ शहरापुरती मर्यादित न राहता हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या उपमार्गिकांद्वारे शहराबाहेरही धावणार आहे.
नव्या मार्गांची वैशिष्ट्ये आणि लांबी
हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड: या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग बोगद्याद्वारे थेट पुरंदर विमानतळापर्यंत नेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रामवाडी ते वाघोली: अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रामवाडीपासून वाघोलीपर्यंत ११ किमी लांबीच्या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल.
advertisement
पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा पर्याय
मेट्रोच्या या विस्तारामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्किंगची चिंता आणि इंधनाचा खर्च वाचवणारा हा हक्काचा पर्याय ठरेल.
advertisement
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे जाळे (नवे मार्ग):
खडकवासला ते खराडी: २५.५१ किमी (२२ स्थानके)
नळ स्टॉप ते वारजे/माणिकबाग: ६.१२ किमी (६ स्थानके)
वनाज ते चांदणी चौक: १.१२ किमी (२ स्थानके)
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणे मेट्रोचा शहराबाहेरही 'विराट' विस्तार! वाघोली आणि लोणी काळभोरपर्यंत जाळं; तुमच्या भागातून जाणार का?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement