Astrology: व्यतिपात योगात घात! होळीनंतर लगेच या राशींवर संकटाचे ढग; ज्योतिषांनी दिला गंभीर इशारा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vyatipat Yog Effects: होळीचा आनंद अजून विरला नसतानाच ज्योतिषशास्त्रात एका नवीन विषयाची चर्चा सुरू झालीय. सूर्य आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे निर्माण होणारा व्यतिपात योग अनेकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. विशिष्ट आकाशीय शक्ती समोरासमोर येतात, तेव्हा त्याचे पडसाद आपल्या कामावर, घरातील वातावरणावर आणि प्रकृतीवर उमटण्याची शक्यता असते. यंदा होळीनंतर येणारा हा योग 3 राशींसाठी विशेष सावधानतेचा इशारा देणारा मानला जात आहे.
व्यतिपात योग म्हणजे काय आणि तो अशुभ का मानतात?ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानुसार, जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे 180 अंशावर असतात, तेव्हा व्यतिपात योग तयार होतो. याला उर्जेचा संघर्षही म्हणतात. सूर्य हा अहंकार आणि आत्मबलाचा कारक आहे, तर चंद्र मन आणि भावनांचा. या दोघांमधील संतुलन बिघडल्यास माणसाची चिडचिड वाढते, मनात अस्वस्थता येते आणि घाईघाईत चुकीचे निर्णय घेतले जातात. यामुळेच या काळात शांत राहण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक दडपणाचा असू शकतो. ऑफिसमध्ये बॉस किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्ही मेहनत करूनही त्याचे श्रेय मिळाले नाही, तर मनात असंतोष निर्माण होऊ शकतो. घरातही स्वभावातील ताठरपणामुळे किंवा अहंकारामुळे भांडणं होऊ शकतात. छोट्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. पैशांच्या बाबतीत रिस्क घेऊ नका, विशेषतः मोठी गुंतवणूक किंवा कोणाला उधार देणं टाळा. प्रकृतीच्या बाबतीत डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. वाहन चालवताना सावधान राहा.
advertisement
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग भावनिक चढ-उतारांचा काळ असेल. मनात सततची बेचैनी किंवा असमाधान राहू शकतं, ज्यामुळे जवळच्या लोकांशी गैरसमज होऊ शकतात. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे वादाची ठिणगी पडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे किंवा ठरवलेले निकाल मिळायला उशीर होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार किंवा रक्ताशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. लांबचा प्रवास करताना काळजी घ्या आणि धैर्याने परिस्थिती हाताळा.
advertisement
advertisement
advertisement
सावधानता हाच उपाय - ज्योतिषशास्त्र परिस्थितीचे संकेत देते, पण घाबरून जाण्याची गरज नसते. सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी फक्त घाई टाळणे, वादापासून लांब राहणे आणि आर्थिक निर्णयांत संयम ठेवणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि शांत व्यवहार अशा कठीण काळाला सहज सोपे बनवू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







