advertisement

Central Railway: मध्य रेल्वेचा होळीला मोठा निर्णय! प्रयागराज दर्शन सोपं, इंदूर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ, वेळापत्रक

Last Updated:

Central Railway: मध्य रेल्वे प्रशासनाने खडकी–इंदूर, हडपसर–प्रयागराज आणि दौंड–कलबुर्गी या मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! उन्हाळ्यात प्रयागराज दर्शन सोपं, इंदूरला स्पेशल ट्रेन, वेळापत्रक
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! उन्हाळ्यात प्रयागराज दर्शन सोपं, इंदूरला स्पेशल ट्रेन, वेळापत्रक
पुणे : होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर व मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामासाठीही काही गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुणे परिसरातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने खडकी–इंदूर, हडपसर–प्रयागराज आणि दौंड–कलबुर्गी या मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. होळीच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक 09324 इंदूर–खडकी साप्ताहिक विशेष गाडी 4 मार्च ते 25 मार्च दरम्यान प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता इंदूर येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 2.50 वाजता खडकी येथे पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक 09323 खडकी–इंदूर विशेष गाडी 5 मार्च ते 26 मार्च दरम्यान प्रत्येक गुरुवारी पहाटे 4.40 वाजता खडकीहून सुटून त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता इंदूरला पोहोचेल. या गाडीस लोणावळा, कल्याण, भिवंडी, सुरत, वडोदरा, नागदा जंक्शन, उज्जैन जंक्शन आणि देवास आदी महत्त्वाचे थांबे असतील.
advertisement
प्रयागराज–हडपसर विशेष गाडी (ट्रेन क्रमांक 04107) 25 मार्चपर्यंत प्रत्येक बुधवारी सकाळी 10:20 वाजता प्रयागराजहून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:30 वाजता हडपसर येथे पोहोचेल. परतीची 04108 हडपसर–प्रयागराज विशेष गाडी 26 मार्चपर्यंत प्रत्येक गुरुवारी रात्री 10:40 वाजता सुटून शनिवारी सकाळी 6:30 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीस दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा, इटारसी जंक्शन आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
advertisement
उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दौंड–कलबुर्गी–दौंड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी 15 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणे व आसपासच्या भागातील प्रवाशांना होळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Central Railway: मध्य रेल्वेचा होळीला मोठा निर्णय! प्रयागराज दर्शन सोपं, इंदूर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ, वेळापत्रक
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement