advertisement

पुण्यात 70 रुपयांच्या पाससाठी 'हायटेक' गंडा! हुबेहूब बनावट ॲप बनवून पीएमपीला लुटलं; कौस्तुभचा तो प्रताप पाहून सगळेच चक्रावले

Last Updated:

कौस्तुभ हा नोकरीनिमित्त दररोज भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉपवरून प्रवास करायचा. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास, त्याने तपासणीसाठी आलेल्या पीएमपी कर्मचाऱ्याला आपल्या मोबाईलमधील 'डेली पास' दाखवला.

तरुणाचा पीएमपीला गंडा (फाईल फोटो)
तरुणाचा पीएमपीला गंडा (फाईल फोटो)
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशनसारखेच हुबेहूब बनावट ॲप तयार करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चक्क बनावट पासेस तयार केल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.
नेमकी घटना काय?
कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय २४, रा. बालाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. कौस्तुभ हा नोकरीनिमित्त दररोज भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉपवरून प्रवास करायचा. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास, त्याने तपासणीसाठी आलेल्या पीएमपी कर्मचाऱ्याला आपल्या मोबाईलमधील 'डेली पास' दाखवला.
कौस्तुभने दाखवलेला पास वरवर खरा वाटत असला, तरी अनुभवी कर्मचाऱ्याला त्यात काहीतरी विसंगती जाणवली. शंका आल्याने त्यांनी तातडीने पीएमपीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून त्या पासचा कोड तपासला. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, कौस्तुभने अधिकृत ॲप वापरण्याऐवजी, स्वतःचे एक 'बनावट ॲप्लिकेशन' तयार केले होते. या ॲपद्वारे तो स्वतःच्या नावावर खोटा ७० रुपयांचा पास जनरेट करून तो अधिकृत असल्याचा बनाव करत होता.
advertisement
तपासाचे चक्र फिरले
कौस्तुभने केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच नव्हे, तर इतरांनाही अशाच प्रकारचे बनावट पास उपलब्ध करून दिले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ काही रुपयांच्या फायद्यासाठी सुशिक्षित तरुणाने गुन्हेगारीचा रस्ता निवडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 70 रुपयांच्या पाससाठी 'हायटेक' गंडा! हुबेहूब बनावट ॲप बनवून पीएमपीला लुटलं; कौस्तुभचा तो प्रताप पाहून सगळेच चक्रावले
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement