advertisement

Vande Bharat Express: मुंबईकडे सुसाट येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससोबत पुन्हा 'ती'च घटना, 12 वर्षांच्या मुलाला पकडलं

Last Updated:

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी भेस्तान स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून एका १२ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलं. 

 Vande Bharat Express:
Vande Bharat Express:
मुंबई : भारतीय रेल्वेची सगळ्या अत्याधुनिक समजली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देशभरात पसरली आहे. पण अजूनही भारतीय लोकांनी मानसिकता काही गेलेली नाही.  गुजरातला जाणाऱ्या एका भरधाव वंदे भारत एक्स्प्रेस एका १२ वर्षी मुलाने दगडफेक केल्यााची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत प्रवाशाला इजा झाली नाही, मात्र वंदे भारत एक्स्प्रेसची काच फुटली आहे.
मिळाालेल्या माहितीनुसार, २६ जाानेवारी रोजी सकाळी ८.३३ वाजेच्याा सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस  22962 सुरतवरून मुंबईला येत होती. भेस्तान स्टेशनपासून जात असताना  कोच C 16 च्या खिडकीवर कुणी तरी दगड फेकला असल्याचं समोर आलं. त्यानंतर  रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज  तपासण्यात आले.
१२ वर्षीय मुलाने फेकला दगड
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी भेस्तान स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून एका १२ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलं.  एएसआय रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल जोगिंदर आणि कॉन्स्टेबल प्रदीप यांनी या मुलाला पकडलं. या मुलाची चौकशी केली असता त्यानेच दगड फेकल्याचं कबुल केलं., हाा मुलगा स्टेशनजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहतो.
advertisement
स्टेशनजवळ खेळत असताना चुकून वंदे भारत एक्स्प्रेसवर दगड फेकला, असल्याचं मुलाने साांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांना बोलावण्यात आलं आणि घटनास्थळावर पोलिसांनी दोघांची साक्ष घेऊन पंचनामा केला. या मुलाला त्याच्या वडिलांसोबत पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांनी उधना इथं घेऊन गेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Bharat Express: मुंबईकडे सुसाट येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससोबत पुन्हा 'ती'च घटना, 12 वर्षांच्या मुलाला पकडलं
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement