Chandra Grahan 2026: आधीच अडीचकीचे भोग, त्यात चंद्रग्रहण! या राशीसाठी एक महिना बेक्कार, राहा अलर्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: 3 मार्च रोजी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रहण सिंह राशीतच दिसणार आहे. या राशीवर आधीच शनीची अडीचकी सुरू आहे, त्यात आता हे ग्रहण आल्यामुळे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते सिंह राशीच्या लोकांसाठी ही दुहेरी मार ठरू शकते. येणारा महिनाभर या राशीच्या लोकांसाठी खूप सावधगिरीचा असेल. या दुर्मिळ योगाचा सिंह राशीवर नेमका काय परिणाम होईल ते पाहुया.
advertisement
advertisement
शनीची अडीचकी आणि चंद्रग्रहण यामुळे पैशांच्या बाबतीत खूप चढ-उतार पाहायला मिळतील. अचानक मोठे खर्च समोर येऊ शकतात किंवा कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्यात आणखी उशीर होऊ शकतो. गुंतवणुकीतून लगेच फायदा मिळण्याची अपेक्षा न ठेवलेलीच बरी. सध्या कोणताही आर्थिक धोका पत्करणं महागात पडू शकतं. त्यामुळे बजेट बनवून चाला आणि फालतू खर्च टाळा. सध्या गुंतवणुकीचे मोठे प्लॅन्स पुढे ढकलणं योग्य राहील.
advertisement
कौटुंबिक आयुष्य - चंद्र हा मनाचा कारक आहे आणि सिंह राशीतच ग्रहण लागत असल्याने नात्यांमध्ये गैरसमज वाढण्याची दाट शक्यता आहे. जोडीदारासोबत खटके उडू शकतात. कुटुंबातील लोक तुमच्या मतांशी सहमत होणार नाहीत, ज्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. मित्र आणि सासरच्या लोकांशी वागताना थोडा संयम ठेवा, नाहीतर दुरावा निर्माण होऊ शकतो. घरच्यांना तुमच्याशी मोकळेपणाने बोलणं थोडं कठीण जाईल, असा हा काळ आहे.
advertisement
आरोग्य - या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या जाणवू शकतात. नीट झोप न लागणं, सततचा थकवा आणि डोकेदुखी यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. तुमची रोजची कामं विस्कळीत होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात. कितीही धावपळ असली तरी वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जरी ते सध्या तुम्हाला कठीण वाटत असलं तरीही स्वतःला थोडा वेळ द्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








