advertisement

Pune News: घरच्यांना चेन्नईला जातोय सांगितलं; पण पुण्यातच आढळला मृतदेह, वैभवसोबत त्या रात्री 24 व्या मजल्यावर काय घडलं?

Last Updated:

बुधवारी रात्री वैभव, सौरभ आणि त्यांचे काही मित्र पुनावळे येथील पेठकर सियोना हाउसिंग सोसायटीमध्ये जेवणासाठी जमले होते. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास वैभवने इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून खाली उडी मारली असल्याचा संशय आहे.

वैभवसोबत काय घडलं? (प्रतिकात्मक फोटो)
वैभवसोबत काय घडलं? (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये २५ वर्षीय तरुणाचा २४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याने कुटुंबाला कामासाठी चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते, मात्र तो शहरातच थांबला होता आणि अखेर ही भयंकर घटना घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा चांदखेड परिसरातील त्याचा मित्र सौरभ तापकीर याच्या पोल्ट्री फार्मवर कामाला होता. बुधवारी रात्री वैभव, सौरभ आणि त्यांचे काही मित्र पुनावळे येथील पेठकर सियोना हाउसिंग सोसायटीमध्ये जेवणासाठी जमले होते. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास वैभवने इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून खाली उडी मारली असल्याचा संशय आहे. आवाज होताच मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
advertisement
दोन दिवसांपासूनचा सस्पेन्स
वैभवने दोन दिवसांपूर्वी आपल्या काळेवाडीतील कुटुंबाला "मी कामासाठी चेन्नईला जात आहे" असे सांगितले होते. प्रत्यक्षात तो चेन्नईला न जाता पुनावळे परिसरातच थांबला होता. त्याने घरच्यांपासून ही गोष्ट का लपवून ठेवली, याबाबत आता गूढ निर्माण झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वैभव गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या मानसिक तणावात होता.
आत्महत्येचा संशय
रावेत पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. वैभवच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास रावेत पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: घरच्यांना चेन्नईला जातोय सांगितलं; पण पुण्यातच आढळला मृतदेह, वैभवसोबत त्या रात्री 24 व्या मजल्यावर काय घडलं?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement