IND vs ZIM : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर झिम्बाब्वेचा कॅप्टन संतापला, टीम इंडियाच्या या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Zimbabwe Captain Sikandar Raza Statement : पहिल्या काही ओव्हरमध्येच मॅच जिंकता येत नाही, पण विकेट्स गमावल्यास मॅच नक्कीच हरता येते, असं सिकंदर म्हणाला अन् अर्शदीप आणि अक्षर पटेलवर पराभवाचं खापर फोडलं.
India vs Zimbabwe Super 8 T20 WC : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाने 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचनंतर झिम्बाब्वेची टीम टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. अशातच झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नुकत्याच झालेल्या मॅचमधील पराभवानंतर नाराजी व्यक्त केली आहे. सिंकदर रझाने केलेल्या वक्तव्यानुसार, टीम इंडियाने दिलेलं 257 धावांचं आव्हान पाहून झिम्बाब्वे मॅच हारली होती, असं पहायला मिळतंय.
काय म्हणाला सिकंदर रझा?
बॅटिंग विभागात खेळाडूंनी कमालीची सुधारणा दाखवली असून पहिल्या 6 ओव्हरमध्ये संघाने अधिक चांगल्या पद्धतीने खेळ केला. पहिल्या काही ओव्हरमध्येच मॅच जिंकता येत नाही, पण विकेट्स गमावल्यास मॅच नक्कीच हरता येते, असं सिकंदर म्हणाला अन् अर्शदीप आणि अक्षर पटेलवर पराभवाचं खापर फोडलं. तसेच तरुण खेळाडूंनी मागील चुकांतून बोध घेत या मॅचमध्ये अधिक चांगला खेळ केला, असंही रझा म्हणाला.
advertisement
डिफेन्सिव्ह प्लॅन्स फसला
बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बाबतीत मात्र रझाने नाराजी व्यक्त केली असून यामध्ये अधिक सुधारणेला वाव असल्याचं म्हटलं आहे. डिफेन्सिव्ह प्लॅन्सची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली, असे त्याचे मत आहे. जर बॉलरनी शिस्तबद्ध मारा केला असता, तर टीम इंडियाला 210 ते 220 रन्सपर्यंत रोखणं शक्य झालं असतं, असं देखील त्यानं सांगितलं.
advertisement
तिन्ही विभागांत ताळमेळ असणं आवश्यक
वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांत ताळमेळ असणं आवश्यक असल्याचं रझाने स्पष्ट केलं. झिम्बाब्वेचा संघ सध्या प्रगतीच्या टप्प्यावर असून अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळत आहेत. अशा परिस्थितीत अनुभवाची कमतरता भासत असली तरी, खेळाडू प्रत्येक बॉल गणित काहीतरी नवीन शिकत आहेत, असा विश्वास कॅप्टन सिकंदर रझाने व्यक्त केला.
advertisement
झिम्बाब्वे वर्ल्ड कपमधून बाहेर
दरम्यान, झिम्बाब्वे जरी वर्ल्ड कपमधून बाहेर पडली असली तरी देखील पुढील मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, त्या मॅचमध्ये तिन्ही विभागांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रजाचा मानस आहे. फलंदाजीतील फॉर्म कायम ठेवून फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये सुधारणा केल्यास विजयाची संधी मिळेल, अशी आशा रझाने व्यक्त केलीये. शेवटच्या मॅचमध्ये पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून सकारात्मक निकाल मिळवण्याचा प्रयत्न झिम्बाब्वेचा संघ करणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 7:49 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर झिम्बाब्वेचा कॅप्टन संतापला, टीम इंडियाच्या या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!









